RTE Admission 2022 Online Apply

RTE Admission 2022 Maharashtra https://rte25admission.maharashtra.gov.in/

RTE Admission 2022 Online Apply through the official website https://rte25admission.maharashtra.gov.in/. The Department of Education announced the probable timetable for the year 2022-23 of the 25 percent admissions granted under the Right to Education Act (RTE). RTE admission process was held on 28th December 2022. There is confusion about what documents are needed for the RTE Admission. So here is the List of Documents needed for RTE Admission.

‘शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत (RTE) देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांचे २०२२-२३ या वर्षासाठीचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने गुरुवारी जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार २८ डिसेंबर ते नऊ मे दरम्यान ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाचे संभाव्य वेळापत्रक पाहता मे महिन्यातच ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२२-२२ मधील ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया पाहता शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकाच्याच कालावधीत ती पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेही यंदाही ‘आरटीई’ प्रवेशांची सोडत एकदाच जाहीर केली जाणार असून, शाळांमधील प्रवेशांच्या रिक्त जागांच्या संख्येइतकीच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

RTE Admission 2022 – Important Documents

Required Document for Maharashtra RTE Admission
 • Address proof.
 • Date of birth certificate.
 • Aadhaar card.
 • Photograph.
 • Caste certificate.
 • Income certificate.
 • Disability certificate.
 • Complete List.
 • Bank Passbook

rte25admission.maharashtra.gov.in Lottery Result

Online Apply RTE 25 admission 2022

RTE25 admission 2022-2023


The process continues even after four months of reversal of the RTE admission process. Under the Right to Education Act (RTE), the admission process for 25 per cent reserved seats in private schools in the state is slow and more than 25,000 seats are vacant. The second round will now be implemented for the students on the waiting list. The entire admission process will be completed by October 25, according to the school education department.

RTE मधील २५ हजार जागा रिक्तच

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) राज्यातील खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असून, २५ हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी आता दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. य़ेत्या २५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

 • आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन चार महिने उलटल्यानंतरही ही प्रक्रिया सुरूच आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६८४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या.
 • त्यासाठी दोन लाख २२ हजार ५८४ पालकांनी मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल केले. या मुलांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आल्यानंतर, त्यामध्ये ९७ हजार ९५९ मुलांना प्रवेश जाहीर झाले. या मुलांना प्रवेशासाठी ११ ते ३० जूनची मुदत देण्यात आली होती.
 • त्यापैकी ६८ हजार ९५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. उर्वरित रिक्त जागांवर प्रवेशासाठी मुदतवाढ देऊन पुरेशा संधी दिल्यानंतर प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. या विद्यार्थ्यांसाठी पहिली फेरी राबविल्यानंतर,
 • आता दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत दुसरी प्रतिक्षा फेरी संपवून, प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा शालेय़ शिक्षण विभागाचा मानस आहे. मात्र, प्रवेश प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असून, मुलांचे प्रवेशाचे प्रमाण कमी आहे.
 • त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत २५ हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

Under the Right to Education Act (RTE), the admission process for 25 per cent reserved seats in private schools will start from June 11. The draw for admissions under RTE was drawn on April 7. Admission was announced for 5 thousand 611 students. However, the admission process had to be postponed due to Corona restrictions. Now that the restrictions have been relaxed, the admission process has begun.

आरटीई’ अंतर्गत साडेपाच हजार जागांवर प्रवेश

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. जिल्हय़ातील ६८० जागांवर ५६११ विद्यार्थ्यांचे प्रवेश २० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठीची सोडत ७ एप्रिलला काढण्यात आली होती. त्यात ५ हजार ६११ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर करोना प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी लागली. आता निर्बंध शिथिल करण्यात आल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.

प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश घ्यावा.

पडताळणी समितीने आलेले अर्ज, तक्रारींची शहानिशा करून प्रतीक्षा यादीतील मुलांचे प्रवेश सुरू होण्याआधी प्रवेश द्यावा किंवा देऊ नये याबाबतचा आदेश शाळेला द्यावा. शाळांनी पालकांना प्रवेशासाठी तारखा द्याव्यात आणि आरटीई प्रवेश सुरू झाल्याची माहिती शाळेच्या प्रवेशद्वारावर लावावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा कालावधी संपल्यानंतर रिक्त जागांवर

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे. त्याबाबतच्या सूचना आरटीई संकेतस्थळावर दिल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून

RTE Admission 2021– Under the Right to Education Act (RTE), the admission process for 25 per cent reserved seats in private schools will start from June 11. It has been directed to complete the admission of the students in the selection list within 20 days.

निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश २० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के  राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश २० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

RTE admission 2021

आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठीची सोडत ७ एप्रिलला काढण्यात आली होती. त्यात ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर करोना प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी लागली. आता निर्बंध शिथिल करण्यात आल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.

प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश घ्यावा.

प्रत्यक्ष शाळेत येऊ न शकणाऱ्या पालकांसाठी..

करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेशासाठी प्रत्यक्ष शाळेत येऊ न शकणाऱ्या पालकांनी दिलेल्या मुदतीत दूरध्वनी, ईमेल, व्हॉट्सअॅप द्वारे शाळेशी संपर्क  साधून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


आरटीई’ प्रवेशांची उर्वरित प्रक्रिया लॉकडाउननंतरच

RTE Admission 2021 updates – Parents are facing many problems in fulfilling the required documents for admissions under the Right to Education Act (RTE). Although the RTE admission process will be completed after the lockdown, many parents are facing difficulties in getting income certificates, rental agreements and caste certificates. As a result, the admission of students who have been confirmed in the lottery is still pending.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) मिळणाऱ्या प्रवेशांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउननंतर आरटीई प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणार असली, तरी उत्पन्नाचे दाखले, भाडे करार आणि जातीचे दाखले मिळवण्यासाठी अनेक पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे लॉटरीमध्ये प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशही अद्याप अधांतरीच आहेत.

RTE Admission 2021 updates : Online RTE Admission Process will be continue after lockdown. As per the news only after the lockdown rules are relaxed will the document verification and admission process begin. Candidates read the complete details given below and keep visit on our website regulary.

आरटीई’ प्रवेश लॉकडाउननंतरच होणार आहेत. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांबाबतच्या सूचना ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेच्या वेबसाइटवर देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. ‘संसर्गाची परिस्थिती पाहता सध्या प्रवेशप्रक्रिया राबवणे शक्य नाही. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यानंतरच कागदपत्रे पडताळणी आणि प्रवेशप्रक्रिया सुरू होईल,’ अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी सुधारित तारखा होणार जाहीर

image not found ( लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत पोर्टल वर सूचना दिली जाईल. Covid 19 मुळे पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये )

image not found पालकांसाठी सूचना :

 1. आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२१-२०२२ या वर्षाकरिता लॉटरी द्वारे पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना दिनांक १५एप्रिल २०२१ पासून sms प्राप्त होतील.
 2. पालकांनी फक्त SMS वर अवलंबून राहू नये . पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याकरिता आर.टी.ई. पोर्टल वर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून आपल्या अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक पहावा. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
 3. ज्या विद्यार्थ्यांचे लॉटरी मध्ये सिलेक्शन झालेले आहे त्यांनी प्रवेशाकरिता sms द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच पडताळणी समितीकडे जावे.
 4. पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
  a. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती
  b. आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून पडताळणी समितीकडे घेऊन जावे.
 5. पडताळणी समितीकडे प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच जाताना आपल्या पाल्याला बरोबर घेऊन जाऊ नये.
 6. मुदतीनंतर संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.
 7. पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
 8. तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल
 9. निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे /बाहेरगावी असल्याने/किंवा अन्य कारणामुळे पडताळणी समितीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेणे शक्य नसेल त्यांनी समितीशी संपर्क करून whats app /email किंवा अन्य माध्यमांच्या द्वारे बालकाच्या प्रवेशाकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.

महत्वाचे : प्रतिक्षा यादीतील (waiting list )पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता पडताळणी समितीकडे सध्या जाऊ नये . त्यांच्या करिता rte पोर्टल वर स्वतंत्र सूचना दिल्या जातील

आर.टी.ई.२५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२०२२

RTE Admission 2021-2022 Online Apply : The parents of the students selected in the online draw started sending messages from April 15. The parents of the students selected in the draw want to get admission by April 30 after verifying the required documents through the verification committee of the department. Parents who do not receive the SMS are also urged to check the draw by entering the application number on the website https://student.maharashtra.gov.in. Read the details given below and keep visit us for the further updates. 

ऑनलाइन काढलेल्या सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून मेसेज पाठवण्यास सुरुवात करण्यात आली. सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ३० एप्रिलपर्यंत विभागातील पडताळणी समितीमार्फत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश घ्यायचा आहे. ज्या पालकांना एसएमएस येणार नाही त्यांनी https://student.maharashtra.gov.in या वेबसाइटवर अर्ज क्रमांक टाकून सोडतीची तपासणी करण्याचे आवाहनही पालकांना करण्यात आले आहे. आरटीई प्रवेशासाठी ३ ते ३० मार्चदरम्यान ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांतील ९६ हजार ६८४ जागांसाठी तब्बल दोन लाख २२ हजार ०२९ अर्ज पालकांनी भरले होते. त्यातून ६७ हजार ५५३ विद्यार्थ्यांची निवड झाली.


RTE Admission 2021-2022 Online Apply : Online Admission 2021-2022 For filling up RTE 25% online admission form for the year 2021-2022 on 03rd March 2021 at 3 pm. The deadline is from March 21, 2021. Parents should prepare the necessary documents for admission. All Important notice are given below and the Online Apply link is given here. 

सन २०२१-२०२२ या वर्षाकरिता आर.टी.ई.२५ % ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी दिनांक 03 मार्च 2021 रोजी दुपारी ३ वा. पासून ते 21 मार्च 2021 पर्यंत मुदत आहे. पालकांनी प्रवेशाकरिता आवश्यक कागद पत्रे तयार ठेवावीत.

Important Notice for RTE 25% online Admission

♦ पालकांनी अर्ज भरण्यापूर्वी होम पेज वरील आवश्यक कागदपत्रे आणि FAQ यावर क्लिककरून त्या मधील सर्व सूचना वाचणे आवश्यक आहे.
♦ पालकांनी जवळच्या मदत केंद्रावर (Help Center) जाऊन प्रवेश पात्र बालकाचा अर्ज भरावा .
♦ मदत केंद्रांची यादी होम पेज वर HelpCenters यावर क्लिक केल्यावर प्राप्त होईल.
♦ एका बालकाकरिता एकच अर्ज भरण्यात यावा . एकाच बालकाचे २ किंवा त्याहून अधिक अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द करण्यात येतील .
♦ प्रवेश अर्ज भरताना चुकल्यास ,तो रद्द(Delete Application)करून पुन्हा भरावा. कोणत्याही परिस्थितीत Duplicate अर्ज भरू नयेत .
♦ प्रवेश अर्जात घराचा पत्ता लिहिताना रहिवासी पुरावा म्हणून कोणते कागदपत्र देणार आहे त्या वरीलच पत्ता अचूक भरावा.
♦ पालकांनी प्रवेश अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत जपून ठेवावी.
♦ उत्पन्नाचा दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
♦ यापूर्वी आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रवेश अर्ज भरू नये .

RTE, 25 per cent students from weaker sections are admitted in private schools every year. This year, online applications can be filled from February 9, 2021. According to the schedule, parents have to apply between February 9 and 26. The lottery for seats will start on March 5. The selected parents have to verify the documents between 9th to 26th March 2021. The waiting list will then be announced. Students on the waiting list will be admitted in four stages.

आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, नव्या वर्षासाठी नऊ फेब्रुवारीपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया

औरंगाबाद : आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी यंदा एकच सोडत निघणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रवेशाबाबतचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी इंग्रजी शाळांमध्ये राखीव जागांवर प्रवेशासाठी पात्रताधारक शाळांना ३० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. पात्रता असूनही नोंदणी न करणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

आरटीईअंतर्गत दरवर्षी दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना खासगी शाळांत प्रवेश दिला जातो. यंदा प्रवेशासाठी नऊ फेब्रुवारी २०२१ पासून ऑनलाइन अर्ज भरता येतील. वेळापत्रकानुसार नऊ ते २६ फेब्रुवारीदरम्यान पालकांना अर्ज करायचे आहे. पाच मार्चला जागांची लॉटरी निघेल. अ�E0्ज निवडलेल्या पालकांनी नऊ ते २६ मार्च २०२१ दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादी जाहीर होईल. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना चार टप्प्यांत प्रवेश घेता येईल.

यंदा एकच लॉटरी काढण्यात येणार असून शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच प्रतीक्षा यादी असेल. प्रतीक्षा यादी पूर्ण झाल्यावरही शाळेत जागा रिक्त असल्यास, अर्ज शिल्लक असल्यास पुन्हा सोडत काढून प्रवेश देण्यात येतील, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक द. गो. जगताप यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

Tentative Time Table of RTE Admission संभाव्य वेळापत्रक

 • ८ फेब्रुवारी : शाळांची नोंदणी
 • ९ ते २६ फेब्रुवारी : प्रवेश अर्ज भरणे
 • ५ ते ६ मार्च : ऑनलाइन सोडत
 • ९ ते २६ मार्च : प्रवेश निश्चित
 • २७ मार्च ते ६ एप्रिल : प्रतीक्षा यादी- पहिला टप्पा
 • १२ ते १९ एप्रिल : प्रतीक्षा यादी- दुसरा टप्पा
 • २६ एप्रिल ते ३ मे : प्रतीक्षा यादी- तिसरा टप्पा
 • १० ते १५ मे : प्रतीक्षा यादी- चौथा टप्पा

सोर्स: सकाळ


Extension of time for students for ‘RTE’ Admission

RTE Admission 2021: The school education department has extended the deadline for RTE admission. As per the Right to Education Act, students on the waiting list for admission to 25 percent reserved seats in private schools have been given an extension till Thursday (24th). Fifty-five percent of the students on the waiting list have not yet been admitted. The Directorate of Elementary Education has given this extension to give these students a chance for admission

पुणे – शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवार (ता. २४) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत प्रतीक्षा यादीतील जवळपास ४५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ही मुदतवाढ दिली आहे.

 राज्यातील नऊ हजार ३३१ शाळांमधील एक लाख १५ हजार ४७७ रिक्त जागांवरील प्रवेशासाठी ही प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत नियमित प्रवेश फेरीत ६८ हजार २१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली. प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या ३६ हजार ४५६ विद्यार्थ्यांपैकी ४५ टक्के म्हणजेच १६ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे. प्रतीक्षा यादीतील ५५ टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळावी म्हणून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ही मुदतवाढ दिली आहे.

 प्रवेशाची राज्यातील आकडेवारी 

 •  ९,३३१ – जागा रिक्त असलेल्या शाळा
 • १,१५,४७७ – एकूण राखीव जागा
 • २,९१,३६८ – रिक्त जागांसाठी आलेले अर्ज
 • १, ३७,३८२ – प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी
 • ८४६६९ – प्रवेश घेतलेले विद्यार्थी

Deadline For RTE Admissions Has Been Extended For The Fourth Time Nashik

RTE Admission 2021: The school education department has extended the deadline for RTE admission of students in the state for the fourth time and the admission process will continue till December 21. There are thousands of vacancies in the state of RTE even in December due to delay in getting the documents like income certificate, caste certificate etc. required for admission in Corona period. Due to Corona, the admission process was changed this year. Earlier, the admission to the verification committee was completed at the school level, which facilitated the parents. At the time of admission, the crowd of parents and students decreased at the same time. By the third round of RTE admissions this year, an average of 75 per cent seats had been filled.

75% admissions are done ७५ टक्‍के जागांवर प्रवेश पूर्ण

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरटीई प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने चौथ्यांदा मुदतवाढ दिली असून, २१ डिसेंबरपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे. कोरोनाकाळात प्रवेशासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आदी कागदपत्रे मिळण्यात दिरंगाई झाल्याने डिसेंबरमध्येही आरटीईच्या राज्यात हजारो जागा रिक्त आहेत.;कोरोनामुळे यंदा प्रवेशप्रक्रियेत बदल करण्यात आला. यापूर्वी पडताळणी समितीकडे होणारे प्रवेश शाळास्तरावर पूर्ण करण्यात आल्याने पालकांची सोय झाली. प्रवेशावेळी एकावेळी पालक, विद्यार्थ्यांची होणारी गर्दी कमी झाली. यंदा आरटीई प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीपर्यंत सरासरी ७५ टक्‍के जागांवर प्रवेश पूर्ण झाले होते. त्यामुळे आगामी काळात चौथी फेरीही काढण्यात यावी, अशी पालक व शिक्षणप्रेमींची मागणी होती.

दर वर्षी आरटीईचे प्रवेश लवकर सुरू केले जातील, असे आश्‍वासन शिक्षण विभागाकडून दिले जाते. मात्र प्रवेशप्रक्रिया वेळेत सुरू होत नाही. यंदा तर तब्बल तीन महिने उशिराने प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. त्यामुळेच यंदा प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी डिसेंबर उजाडला आहे. आगामी काळात शिक्षण विभागाने सूक्ष्म नियोजन करून जूनपूर्वीच विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांनी केली आहे

यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आठ महिन्यांपासून ज्ञानमंदिरांना कुलपे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची मात्रा दिली जात आहे. शाळांचे पहिले सत्र संपले असले तरी राज्यात आरटीईचे प्रवेश सुरूच आहेत. जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी एकूण ४४७ शाळा असून, त्याअंतर्गत पाच हजार ५३७ जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या जागांसाठी १७ हजार ६३० अर्ज आतापर्यंत आले असून, त्यांपैकी पाच हजार ३०७ जणांना आरटीईअंतर्गत प्रवेश मिळाला. मात्र त्यातील तीन हजार ६८४ जणांनी आतापर्यंत आरटीईमधून प्रवेश पूर्ण केला आहे. तिसऱ्या फेरीतील प्रवेश पूर्ण झाले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी मात्र शहराच्या तुलनेत कमी प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.


RTE Admission Will Be On RTE 25% Reserved Seats

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी; RTE २५ टक्के राखीव जागांवर होणार अॅडमिशन

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत तुमच्या पाल्याचे नाव लागले असेल आणि अद्याप प्रवेश मिळाला नसेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळणार आहे. आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागा शिल्लक असतील, त्या शाळांमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने प्रयत्न सुरू केले असून लवकरच त्याबाबतची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे.

आर्थिकदृष्टया दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदा प्रक्रियेतील पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. पहिल्या सोडतीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यावर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. या प्रक्रियेनंतरही अजूनही जागा रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील पण अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. आता याच प्रक्रियेत आणखी एक संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. प्रतिक्षा यादीत नाव असतानाही अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळांमधील रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेऊन प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील प्रवेशाचा पुढील टप्पा लवकरच जाहीर होणार आहे.


शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ ची इयत्ता १ ली करता नवीन विद्यार्थी नोंदणी Excel द्वारे सुरु करण्यात आली आहे…

शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे. प्रमोशन करते वेळी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
१. प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे.
२. प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट Approve कराव्यात.
३. शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन ‘Drop Box’ मध्ये होईल.
४. काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.

आरटीई प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत मुदत…

https:// student.maharashtra.gov.in

RTE Admission 2020 – Under the Right to Education Act (RTE), students on the waiting list for admission to 25 per cent reserved seats will be able to get admission till next Thursday (Thu. 29). The first draw in the admissions process was drawn in March. However, the lockdown was announced after the corona infection increased. Therefore, the admission process was postponed. The process was then resumed a few months ago. Accordingly, the admission process of the first list students was carried out till September. The process is then being implemented for the students on the waiting list. 24 thousand 980 students were selected from the waiting list in the state. Of these, admission of eight thousand 480 students has been confirmed so far. Provisional admission of eight thousand 176 students has been made.

पुणे – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना येत्या गुरुवारपर्यंत (ता. 29) प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेतील पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. मात्र त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर ही प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानुसार पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत राबविण्यात आली. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रतीक्षा यादीत 24 हजार 980 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातील आठ हजार 480 विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्‍चित झाले आहेत. तर आठ हजार 176 विद्यार्थ्यांचे प्रोव्हिजनल प्रवेश झाले आहेत.

Important notice for Parents पालकांसाठी सूचना :

 • – रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाईल
 • – पालकांनी आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख अर्ज क्रमांक टाकून पाहावे
 • – शाळेत प्रवेशासाठी पालकांनी गर्दी करू नये
 • – बालकांना शाळेत घेऊन जाऊ नये
 • – आवश्‍यक मूळ कागदपत्रे आणि कागदपत्रांच्या छायांकित प्रती घेऊन जावे
 • – पोर्टलवरुन हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे

Selection Lists प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची सद्यःस्थिती :

जिल्हा : निवड झालेले विद्यार्थी : प्रोव्हिजनल प्रवेश : निश्‍चित प्रवेश

 • पुणे : 4,765 : 1,885 : 1,624
 • नगर : 803 : 335 : 368
 • नाशिक : 1,360 : 480 : 432
 • सोलापूर : 446 : 212 : 202
 • ठाणे : 1,912 : 492 : 757
 • औरंगाबाद : 1,539 : 292 : 395
 • नागपूर : 1,780 : 756 : 431
 • कोल्हापूर : 270 : 89 : 128

आरटीई प्रवेश प्रक्रिया; ८ आॅक्टोबरपर्यंत करता येणार प्रवेशनिश्चिती, पालकांना दिलासा

बालकांचा मोफत व सक्तीच्याशिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी  शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. १७ मार्चला आरटीई प्रवेश प्रक्रियेची आॅनलाइन पहिली सोडत काढण्यात आली. राज्यातील ९,३३१ शाळांमधील  १ लाख १५ हजार ४५५ जागांसाठी २ लाख ९१ हजार ३६८ अर्ज आले होते.

पहिल्या सोडतीत १ लाख ९२६ विद्यार्थ्यांची निवड झाली. कोरोनाकाळात मुदतवाढीनंतर ६८,२८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. यात पुण्यातून सर्वाधिक ११,०१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याखालोखाल नागपूर ४,५९९, नाशिक ३,६८८, ठाणे ५,६४१, मुंबई ३,१३२ आणि औरंगाबाद येथील ३,०९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले

मुंबई विभागातील पालिका विभागाच्या अखत्यारीतील शाळांमधून २,२४३, उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील शाळांमधून ८८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मुंबईतून निवड झालेल्या ५,३७१ पैकी ५,२२८ विद्यार्थ्यांना शाळांनी प्रवेशासाठी तारीख दिली होती. यातील ३,१३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले

आरटीई २५ टक्के अंतर्गत पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर अखेर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी संधी मिळाली. १ आॅक्टोबरपासून प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ८ आॅक्टोबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घेता येईल. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला.

त्यानंतर आता रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील. ‘एसएमएस’द्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाईल. पालकांनी आरटीई पोर्टलवर विद्यार्थी अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाची तारीख पाहावी, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

प्रवेशासाठी शाळेत गर्दी करू नये. प्रवेशादरम्यान बालकांना शाळेत आणू नये. कागदपत्रांच्या मूळ, छायांकित प्रती सोबत असाव्यात. हमीपत्र, अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत न्यावी, अशा सूचना शिक्षण विभागाने पालकांना केल्या आहेत.


अद्यापही अनेक शाळांमध्ये प्रवेश शिल्लक!!

RTE Admission 2020-2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्यामुळे आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला खीळ बसली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ३१ आॅगस्टपर्यंत मुदत देऊनही आरटीईअंतर्गत अपेक्षित प्रवेश होऊ न शकल्याने आता प्रवेशनिश्चितीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ म्हणजे आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यंदा प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज मागवून १७ मार्च रोजी लॉटरी काढण्यात आली. दरम्यान, राज्यात आरटीईच्या ९,३३१ शाळांमध्ये एकूण १ लाख १५ हजार ४६० जागा असून, त्यापैकी आतापर्यंत केवळ ५३,६८७ जागांवर प्रवेश निश्चित होऊ शकले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थी-पालकांसह मूळ गावी स्थलांतरित झाल्यामुळे प्रवेशनिश्चितीसाठी ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुदतवाढीचा निर्णय घेतल्याची महिती आरटीई समन्वयकांनी दिली. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मात्र, यामुळे प्रवेशासाठी आणखी ताटकळत बसावे लागेल.


सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामधील RTE अंतर्गत 25 % विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https:// student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत येत आहे. मात्र कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा फटका प्रवेश प्रक्रियेलाही बसला आहे. अजूनही अनेक शाळांमध्ये आरटीईचे प्रवेश शिल्लक आहेत. त्यामुळे शाळांनी विहीत कालावधीत प्रवेश प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे.

येत्या 31 ऑगस्टला सदर प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन लॉक म्हणजेच बंद केली जाणार आहे अशा सुचना प्राथमिक शिक्षण सहसंचालकांनी दिलेल्या आहेत.कोल्हापूर जिल्हयामध्ये RTE अंतर्गत 345 शाळांमधील 3486 जागांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. एकूण 2996 ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले असून NIC सेंटर, पुणे यांचेकडून प्रथम फेरीतील प्रवेशासाठी 2388 विद्यार्थ्यांची निवड करणेत आलेली आहे. मात्र त्यापेकी केवळ 1016 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले असून अद्याप 1372 विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित आहेत. RTE प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शिक्षण सहसंचालक श्री. दिनकर टेमकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली असून त्यामध्ये सदर प्रवेश प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत राबविली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे उर्वरीत मुदतीत शाळांनी RTE प्रवेश प्रक्रिया राबविताना अधिकाधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.प्रलंबित विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणेसाठी शाळांनी पालकांशी संपर्क साधावा व विहीत मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे.


RTE Admission 2021 Time Table

आरटीई पोर्टल चार दिवसांपासून बंद

RTE Maharashtra Admission 2020 Required Documents –आरटीई महाराष्ट्र प्रवेश 2020 आवश्यक कागदपत्रे

RTE Online Application Starting

RTE Online Application Starting 2020 : RTE Online Application Starting Under the Teaching Act 25% of the reserved seats in the private schools in the district are being started from Tuesday. The primary education directorate has recently announced the schedule for the online admission of RTE for the academic year of 2020-2021. Accordingly, admissions were verified by the group supervisors from 8 to 22 February in schools.
In connection with the inspection of the registered schools, the Teaching Officers of the Education Officers were asked to immediately scrutinise the schools and submit the report. After that the entrance examination will be started from 5th March 2019 and the admission process will be started.

Notification Detail For RTE Online Application

Details about Admission Process For RTE 25% Reservation

Admission Process for RTE 25% reservation through online application
Part – I: School
Eligible schools to fill the following details and get the approval of Cluster / URC head
a) School Contacts
b) Valid age limit for admission
c) Total strength, (30 sept 2014) intake and vacancies for RTE 25% reservation
d) Accurate school location on Google map

Part – II: Child
The steps involved are as follows
1) Get your application number registered on the system The application number and password will be communicated on your registered mobile.
2) Enter child details, parent details.
3) Locate the address accurately to list schools within 1 KM and within 1-3 KM range from your house.
4) Select the required standard.
5) Upload required documents.
6) Confirm the application
7) After confirmation, take the printed application

Part – III: Lottery
1) The schools having more vacancies and less number of applications will allot the seats to all applicants.
2) The schools having low vacancy will use lottery system. The lottery will be drawn and generated by the district administration i.e. Education officer, Primary for the district.
3) The selection list will be published on the system.
4) The list will be available for parents. The admission card can be printed.
5) Schools will be able to complete the requirements of students.

Important Document For Admission processes:

Documents like Address prof, Cast certificate ,Handicap Certificate Birth Certificate etc.

Click Here For The Detail Description For Document .

Details about District wise total sets For RTE 25% Reservation

RTE STATUS
District Total
Ahmadnagar 504
Akola 625
Amravati 450
Aurangabad 1222
Bhandara 235
Bid 358
Buldana 375
Chandrapur 389
Dhule 192
Gadchiroli 39
Gondiya 224
Hingoli 30
Jalgaon 663
Jalna 233
Kolhapur 65
Latur 390
Mumbai 1223
Mumbai 172
Nagpur 3414
Nanded 675
Nandurbar 21
Nashik 1835
Osmanabad 94
Palghar 122
Parbhani 56
Raigarh 350
Ratnagiri 43
Sangli 0
Satara 22
Sindhudurg 5
Solapur 307
Thane 1236
Wardha 347
Washim 11
Yavatmal 499
Total 16426

Important Link

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज करा

1 thought on “RTE Admission 2022 Online Apply”

 1. Education v aarogey yavr सरकारने लोकांसाठी सेवा जास्तीत जास्त निधी खर्च केला पाहिजे.प्रायव्हेट हायस्कूल मध्ये , व खाजगी शाळा मधे प्रवेश प्रक्रिया सोपी करावी. व दवाखाना यांचे कमीत कमी रेट फायनल करावे.सर्वांना शिक्षण व आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात यावी.

  Reply

Leave a Comment