Sangli Arogya Vibhag Bharti 2021

Sangli Arogya Vibhag Bharti 2021

आरोग्य विभागातील ८५०० जागेच्या मेगा भरतीला उद्या पासून सुरुवात…

17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. उद्या (18 जानेवारी) नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. पूर्ण माहिती येथे पहा ..

सांगली आरोग्य विभाग ४२७ जागेची भरती

As per the news of Sangli Arogya Vibhag – Although the government has stopped recruitment, posts in the health department have been left out. 44 posts from other departments of Sangli Zilla Parishad are stuck in recruitment. However, the question is whether there will be recruitment for 427 posts in the health department. This recruitment is pending for almost a year.

The government had invited online applications for recruitment of vacancies from Zilla Parishads in the state. Sangli Zilla Parishad for recruitment on 471 vacant posts. Candidature application was started to be filled online on March 26, 2019. Deadline for filing of candidature application is dt. It was April 23, 2019. The recruitment process was being carried out at the state level. Meanwhile, Lok Sabha elections were held. Even after the assembly elections, there was no movement regarding recruitment. Candidates were concerned about when the online exam would be held.

‘आरोग्य’च्या ४२७ पदांवर तरी भरती होणार का ?

शासनाने नोकरभरती थांबविली असली तरी आरोग्य विभागाकडील पदे त्यातून वगळली आहेत. सांगली जिल्हा परिषदेकडील अन्य विभागांकडील 44 पदे भरतीबंदीत अडकली आहेत. मात्र आरोग्य विभागाकडील 427 पदांवरील भरती तर होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ही भरती जवळपास वर्षभर प्रलंबित आहे.
शासनाने राज्यातील जिल्हा परिषदांकडील रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले होते. सांगली जिल्हा परिषदेकडे रिक्त 471 पदांवर भरतीसाठी दि. 26 मार्च 2019 रोजी उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्यास सुरूवात झाली होती. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 23 एप्रिल 2019 होती. भरतीप्रक्रिया राज्यस्तरावरून राबविली जात होती. दरम्यान लोकसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकही झाली तरी भरतीबाबत काहीच हालचाल झाली नाही. ऑनलाईन परीक्षा केव्हा होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते.
मात्र शासनाने आता ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर तिजोरीवरील बोजा कमी करण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. भरतीबंदी, नवीन योजनांना कात्री, योजनांवरील खर्च कमी करणे, खरेदीवरील खर्च कमी करणे आदींबाबत शासन निर्णय जारी झालेला आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वित्त विभागाच्या शासन निर्णयामुळे आता आरोग्य विभाग वगळता अन्य पदांची भरती होणार नाही. पण सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील 427 पदांवरील भरती तर होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या करू नये, असा शासन निर्णय वित्त विभागाने काढला आहे. ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने केली आहे.
या पदांवरील भरती अडकली : कनिष्ठ अभियंता स्थापत्य (बांधकाम)- 8, कनिष्ठ अभियंता स्थापत्य (ग्रामीण पाणीपुरवठा)- 5, कंत्राटी ग्रामसेवक- 7, विस्तार अधिकारी कृषी- 1, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक- 16, पर्यवेक्षिका (महिला व बालकल्याण) – 6, विस्तार अधिकारी सांख्यिकी- 1. एकूण पदे : 44
या पदांवरील भरतीस नाही अडथळा : आरोग्य पर्यवेक्षक- 3, औषध निर्माता- 11, प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 1, आरोग्य सेवक पुरुष- 173, आरोग्य सेविका- 239 : एकूण पदे :- 427

सौर्स : पुढारी
6 thoughts on “Sangli Arogya Vibhag Bharti 2021”

Leave a Comment