SBI मध्ये नोकरीची उत्तम संधी – 3850 पदांची भरती

SBI CBO Recruitment 2020 : State Bank of India, the largest government bank in the country, has brought an employment opportunities. The process of registration for 3850 officer posts has started from 27th July 2020. Of the total vacancies, 750 posts each are in Gujarat and Karnataka, 296 in Madhya Pradesh, 104 in Chhattisgarh, 550 each in Tamil Nadu and Telangana, 300 in Rajasthan, 517 in Maharashtra and 33 in Goa. Candidates can apply for the job till 16th August 2020. This selection process will be done under SBI Officer Recruitment 2020. Interested candidates who want to apply for Circle Based Officer post can apply by visiting the official website sbi.co.in. or from the link given below.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी!

भारतीय स्टेट बँकेने आपल्या सात सर्कलमधील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्कल बेस्ड ऑफीसर्सच्या ३ हजार ८५० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीप्रक्रियेमध्ये महाराष्ट्र आणि गोवा विभागासाठी ५१७ आणि ३३ पदांवर भरती होणार आहे.या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.

SBI भरती 2020- 3850 पदे

एसबीआय ने आपल्या सात सर्कलमधील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्कल बेस्ड ऑफीसर्सच्या कायम पदांसाठी हे अर्ज मागवले असून,या पदांची सर्कलप्रमाणे विभागणी पुढीलप्रमाणे आहे.

रिक्त पदांचा तपशील

  • अहमदाबाद (गुजरात) ७५० पदे
  • बंगळुरू (कर्नाटक) ७५० पदे
  • भोपाळ (मध्य प्रदेश, छत्तीसगड) २९६ आणि १०४ पदे
  • चेन्नई (तामिळनाडू) -५५० पदे
  • हैदराबाद (तेलंगाणा) – ५५० पदे
  • जयपूर (राजस्थान) – ३०० पदे
  • महाराष्ट्र ( मुंबईला वगळून महाराष्ट्र, गोवा) ५१७ आणि ३३ पदे

या भरती प्रक्रियेसाठीची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. अर्ज करणारा उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. अर्जदाराकडे कुठल्याही व्यावसायिक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारीपदावर काम केल्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. अर्जदार उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२० रोजी ३० वर्षांहून अधिक नसावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *