Shikshak Bharti 2021 new update

Shikshak Bharti 2021 new update

Shikshak Bharti 2021 : As per the news received from news source teacher recruitment through the Pavitra portal has been delayed due to pre-reservation change. This recruitment has not found a moment yet so there is resentment among the candidates. The reservation for the candidates who have applied for this recruitment has been given an interim stay on the reservation for the Socially and Educationally Backward (SEBC) class. Therefore, on the basis of the petition, the High Court has asked the government to login as per the provisions of 23 December 2020 and make the category change by 14 January. Therefore, the recruitment process has stalled again.

पवित्र पोर्टलद्वारेची शिक्षक भरती आणखी लांबणीवर

राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती पुन्हा आरक्षण बदल झाल्याने लांबली आहे. या भरतीला अजून मुहूर्त सापडेना त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने शैक्षणिक संस्थातील शिक्षक भरती पारदर्शी व्हावी या या हेतूने राज्य शासनाने पवित्र पोर्टलची निर्मिती केली. मात्र, या पवित्र भरतीला सुरुवातीपासूनच घरघर लागली, मध्यंतरीच्या काळात शासकीय कोट्यातील 5800 जागा भरल्या उर्वरित जागा 6000 अजून भरणे बाकी आहे. या मध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांचा मोठा सहभाग आहे.

आरक्षणात बदल; पवित्र शिक्षक भरती पुन्हा रखडली

या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या आरक्षणामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील आरक्षणास अंतरिम स्थागिती दिलेली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिकांच्या आधारे शासनाने 23 डिसेंबर 2020 मधील तरतुदीनुसार लॉगिन करुन 14 जानेवारीपर्यंत प्रवर्ग बदल करून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. यानंतर आता 25 जानेवारी रोजी मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. त्यात बदल झाला तर पुन्हा आरक्षणाचा बदल उमेदवारांना करावा लागणार आहे. याला मोठा कालावधी लागणार असल्याने भरती प्रक्रिया पुन्हा रखडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तरी शासनानेही भरती बाबत ठोस निर्णय घेऊन एकदाचा हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी उमेदवारांतून होत आहे.

सोर्स: सकाळ


शिक्षकेतर कर्मचारीभरती करण्याची मागणी

शिक्षकांसाठी खुशखबर! NCTE ने घेतला TET वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय

Shikshak & Shipai Bharti 2021 : Exactly when the school will start is not yet to be decided. However, when schools start, regular cleaning of schools will be the biggest issue. For this, the schools will need additional staff. That is why the demand for non-teaching staff, which has been stalled since 2001, should be resumed. As the recruitment of non-teaching staff is banned in the state, these posts of servants and peons are vacant. Against this background, we demand that the recruitment of servants and peon staff in schools should be allowed immediately.

Shikshak & Shipai Bharti 2021

शाळा नेमक्या कधीपासून सुरू करायच्या, याचा निर्णय अजून झालेला नाही. मात्र, शाळा सुरू होतील, तेव्हा शाळांची नियमित साफसफाई व स्वच्छता हा सर्वांत मोठा प्रश्न असेल. त्यासाठी शाळांना अतिरिक्त सेवक-शिपायांची गरज भासेल. त्यासाठीच २००१ पासून रखडलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राज्यात २००१-०२ पासून शालेय शिक्षण विभागात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे. शिक्षकेतर पदे निश्चित करून तातडीने पदभरती करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळासह अनेक संघटनांनी वारंवार आंदोलने केली, मोर्चेही काढले. त्यानंतर सरकारने २८ जानेवारी २०१९ रोजी शासन आदेश काढून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची काही प्रमाणात भरती करण्यास परवानगी दिली होती; परंतु शिपाई व सेवक कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत निर्णय प्रलंबित ठेवला होता. आताही करोनाच्या पार्श्वभूमीवर चार मे २०२० रोजी सरकारने आदेशद्वारे नवीन नियुक्ती करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे ही पदे रिक्तच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनेक खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांना शालेय परिसराची साफसफाई, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित वावर ठेवणे, त्यानुसार शालेय फर्निचर मांडणी व अन्य बाबींची स्वच्छता, स्वच्छतागृह आदी कामांसाठी शाळांत सेवकांची, शिपाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी सांगितले.

राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला बंदी असल्याने ही सेवक, शिपाई पदे रिक्तच आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने शाळांमध्ये सेवक, शिपाई कर्मचारी भरती करण्याची परवानगी दिली जावी, अशी आमची मागणी आहे. – प्रसन्न कोतुळकर, जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळ


‘शिक्षक भरतीला परवानगी मिळावी’

The state government has decided to take measures considering the impact of corona virus on the state’s economy in the year 2020-21. The decision clarifies that new appointments should not be made. The state government has ordered that no department other than the Department of Health and Medical Education should make new appointments. The All India Urdu Teachers Association has demanded that this decision be reconsidered and special permission be given for the recruitment process of Urdu and Marathi medium teachers. The team has given a statement to the state chief minister in this regard.

राज्य सरकारने आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागाने नवीन प्रकारची पदभरती करू नये, असे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा फेरविचार करून उर्दू व मराठी माध्यमाच्या शिक्षक भरती प्रक्रियेस विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने केली आहे. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना संघाने निवेदन दिले आहे.

राज्यात करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ या वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम विचारात घेऊन उपाययोजना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयात नवीन पदभरती करू नये असे स्पष्ट केले आहे. राज्यात गेल्या दहा वर्षांपासून शिक्षक भरती केलेली नाही. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयातसुद्धा कोणत्याही प्रकारची पदभरती करू नये असे म्हटले आहे. या निर्णयामुळे राज्यात शिक्षक भरती होण्याची वाट पाहणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा आणि उर्दू व मराठी माध्यमाच्या शिक्षक भरतीस विशेष परवानगी द्यावी. शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी संघटनेने या निवेदनाद्वारे केली आहे.

सौर्स : मटा

पवित्र पोर्टलद्वारेच्या शिक्षक भरतीसाठी विशेष परवानगी मिळवण्यासाठी धडपड

Teachers Recruitment 2021 Latest updates – The process for recruitment of teachers through the holy portal has been going on for a quarter of a year in the state. All the advertisements for teacher recruitment have already been published. Teacher recruitment in schools needs to be completed to enhance the academic quality of students. Therefore, the education department has started a struggle to get special permission from the government for teacher recruitment. For this, a proposal will be sent to the state government in two days through Education Commissioner Vishal Solanki. Read the complete details carefully and keep visit us for the further updates.

Teachers Recruitment 2021 Latest updates

राज्यात पवित्र पोर्टलद्वारेच्या शिक्षक भरतीसाठी सव्वा वर्षापासून प्रक्रिया सुरु आहे. शिक्षक भरतीसाठी पूर्वीच सर्व जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शाळांमधील शिक्षक भरतीचा टप्पा पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शिक्षक भरती साठी शासनाकडून विशेष परवानगी मिळवण्यासाठी शिक्षण विभागाने धडपड सुरु केली आहे. यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या मार्फत राज्य शासनाकडे दोन दिवसात प्रस्तावही पाठविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने वर्षापूर्वी घेतला होता. नवीन व जून्या शासनाने विविध विभागाच्या मेगा भरतीच्या अनेकदा घोषणा ही केल्या. मात्र त्याची पूर्तता होऊ शकली नाही. हे उमेदवारांबाबत अन्यायकारकच आहे. शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठी पवित्र पोर्टलही कार्यान्वित करण्यात आले होते. या भरती प्रक्रियेत सुरुवातीपासून कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचे अडथळे येतच आहे.
आता गेल्या महिन्यापासून करोना विषाणूचा वाढलेला प्रादुर्भाव व त्यामुळे जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन हा शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी मार्च अखेर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. मात्र ते अडथळ्यामुळे कोलमडले आहे.

राज्यात 12 हजार 140 शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठीचा कार्यक्रम आखण्यात आला होता. निवड यादीतील सुमारे 6 हजार उमेदवारांना शाळांमध्ये नोकरी मिळाली आहे. माजी सैनिकांच्या 1 हजार 200 जागांसाठी आरक्षणनिहाय उमेदवार मिळाले नाहीत. खासगी शाळांमध्ये मुलाखती घेऊन उमेदवारांची शिक्षक भरती करण्यात येणार आहे. यात 850 शैक्षणिक संस्थांमधील 3 हजार जागा भरण्यात येणार आहेत.
दरम्यान, राज्य शासनाच्या वित्त विभागाने करोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली असल्याचे नमूद करत काटकसरीच्या दृष्टीने काही निर्णय जाहीर केले आहेत. यात सार्वजनिक आरोग्य , वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभाग वगळता इतर कोणत्याही विभागात नवीन पदभरती करू नये असे स्पष्ट केले आहे. यामुळे नोकरभरतीला बंदी घालण्यात आल्याचे जाहीर होताच बेरोजगार उमेदवाराकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. या नोकरभरती वरील बंदीमुळे सुमारे ४ हजार ५०० जागांची शिक्षक भरती अडकून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी उमेदवारांकडून होऊ लागली आहे.

पवित्र पोर्टलद्वारेची उर्वरित शिक्षक भरती शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. ‘आरटीई’ कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या पटसंख्या नुसार शाळांमध्ये शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. या भरतीतील जुनीच सर्व कामे पूर्ण करावयाची आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेस परवानगी मिळण्याची गरज आहे. यासाठी शासन स्तरावर प्रस्तावातून सविस्तरपणे बाजू मांडण्यात येणार आहे. शासनाने शिक्षक भरतीसाठी सकारात्मकता दर्शविणे अपेक्षित आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.

सौर्स : प्रभात
शिक्षक भरतीचा मुहूर्त लॉकडाऊन संपल्यानंतरच मिळणार गती

Teachers Recruitment 2021 : As per the news Mega Teachers Bharti 2020 will be process after the lockdown. The education department was trying to implement the recruitment process of Shikshak Bharti 2020 by the end of March this year. Candidates were expected to fill about twelve thousand seats in the state through this. But now, due to the Corona effect recruitment of candidates who are stuck in the process, there are fears among the candidates that it will be even more pending. Read the complete details given below and keep visit us…

Teachers Recruitment after the lockdown :

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दीर्घकाळ रखडलेली शिक्षक भरती सुरू करण्यासाठी शासनाने हालचाल सुरू केली होती. मात्र, आता लॉकडाऊन मागे घेतल्याशिवाय पुन्हा हे चक्र सुरळीत होऊ शकणार नाही. तर राज्यामध्ये असणाऱ्या जिल्हाबंदीचा निर्णय शिथील केल्याशिवाय खासगी संस्थांनाही शिक्षक भरती करता येणे कठीण होणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने शिक्षक भरतीच्या मुहूर्तावरदेखील याचे सावट आहे. अगोदरच ‘नकटीच्या लग्नास सतराशे विघ्न’ या उक्तीनुसार ही भरतीप्रक्रिया दीर्घकाळ रखडली आहे. यातच करोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनची भर यात पडली आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी मोठ्या कालावधीनंतर सुमारे दीड वर्षापूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या रिक्त जागा पुन्हा भरण्याचा निर्णय घेतला होता. या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पवित्र पोर्टलही सुरू करण्यात आले होते. या पोर्टलद्वारे भरतीवरून देखील मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या. या भरतीत सुरुवातीपासून काही ना काही अडसर येत गेला यातच आता करोनाच्या फटक्याची मोठी भर यात पडली आहे. शिक्षण विभागाच्या वतीने यंदा मार्च अखेरपर्यंत ही भरतीप्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न होता. या माध्यमातून राज्यातील सुमारे बारा हजारावर जागांची भरती होण्याची अपेक्षा उमेदवारांमध्ये होती. मात्र आता प्रक्रियेत अडकलेल्या उमेदवारांची भरती करोनामुळे आणखीच प्रलंबित राहण्याची भीती उमेदवेारांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

TET Results will be postponed टीईटीचा निकालही लांबणीवर

दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) या परीक्षेचा निकालदेखील लांबणीवर पडला आहे. या परीक्षेची अंतरीम उत्तरसूची जाहीर करण्यात आल्याने उमेदवारांना अंतिम निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यंदा शासनाने नवीन नियमानुसार काही नवीन वर्गवारीसाठी गुणांचीही सवलत वाढविली आहे. नव्या नोंदींनुसार निकषांमध्ये बसणाऱ्या उमेदवारांना या सवलतीचा फायदाही देण्यात येत आहे. मात्र यंदा करोनाच्या फटक्याने टीईटी परीक्षेचाही निकाल लांबल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

सौर्स : मटा

पवित्र पोर्टलद्वारेची शिक्षक भरती आणखी लांबणीवर

Due to the Corona Virus the Shikshak bharti process will be delay. After the lockdown finished this process will be continue. With the increase in the prevalence of coronas in the state, the process of recruitment of teachers through the Pavitra Portal has slowed down. It has been decided to start the next recruitment process only after the lockdown. It has become clear that recruitment of teachers, mainly from private educational institutions, will be possible after the lifting of the district ban in the state. The teacher recruitment schedule has collapsed. Read the complete details given below:

Teachers Recruitment 2021 is postponed now

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरतीची प्रक्रिया थंडावली आहे. आता लॉकडाऊन उठल्यानंतरच भरतीची पुढील प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रामुख्याने खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक भरती ही राज्यातील जिल्हा बंदी उठल्यानंतर करता येणार आहे हे स्पष्ट झाले आहे. शिक्षक भरतीचे वेळापत्रकच कोलमडले आहे.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दीड वर्षापूर्वी घेतला होता. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावे यासाठी पवित्र पोर्टलही कार्यान्वित करण्यात आले. या भरती प्रक्रियेत सुरुवातीपासून कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचे अडथळे येतच आहेत. पोर्टलमधील तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल झालेल्या याचिका, उमेदवारांना पोर्टलवर माहिती अपडेट करण्यासाठी सतत देण्यात आलेली मुदतवाढ, पात्र असतानाही निवड यादीत संधी न मिळणे, उमेदवारांची आंदोलने, शिक्षण आयुक्तांकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी उमेदवारांमध्ये लागलेली स्पर्धा यामुळे भरती प्रक्रियेत अनेकदा व्यत्ययच निर्माण झालेला आहे हे स्पष्ट आहे.
त्यातच आता गेल्या महिन्यापासून करोना विषाणूचा वाढता प्रभाव हा शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. आधी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर 3 मे पर्यंत ते वाढविण्यात आले आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी मार्च अखेर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. पात्र उमेदवारांवर अन्याय होऊ नये अशीच भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.

राज्यात 12 हजार 140 शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठीचा कार्यक्रम आखण्यात आला होता. निवड यादीतील सुमारे 6 हजार उमेदवारांना शाळांमध्ये नोकरी मिळाली आहे. कागदपत्रांची पडताळणी करण्यास गैरहजर राहिलेल्या, अपात्र ठरविण्यात आलेल्या सुमारे 300 उमेदवारांना पुन्हा एकदा संधी देण्याबाबतचा विचारही सुरु आहे. माजी सैनिकांच्या 1 हजार 200 जागांसाठी आरक्षणनिहाय उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे या जागा कव्हर्ट करण्यात येणार आहेत.

खासगी शाळांमध्ये मुलाखती घेऊन उमेदवारांची शिक्षक भरती करण्यात येणार आहे. यात 850 शैक्षणिक संस्थांमधील 3 हजार जागा भरण्यात येणार आहे. या उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी संधी देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवावे लागणार आहे. ही खासगी शाळांमधील भरतीही लॉकडाऊन उठल्यावरच राबविण्यात येणार आहे. त्यातही जिल्हा बंदी शिथिल झाल्यानंतरच हा भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. उमेदवारांसाठी शिक्षक भरती बाबत वेळोवेळी योग्य त्या सूचना पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

सौर्स : प्रभात
अपुरे शिक्षक अन् सुमार दर्जाचे शिक्षण

महाविकास आघाडी लवकरच शिक्षकांची मेगाभरती करणारNew Update

पवित्र शिक्षक भरती मार्चअखेर करणार

दहा वर्षानंतर ‘शिक्षक’ पदी नियुक्ती

शिक्षक भरतीसाठी ८३८ उमेदवारांची यादी जाहीर

म.टा. प्रतिनिधी, पुणे – As per the latest news Shikshak Bharti is in process. Lots of people waiting for this recruitment. There is no teacher to teach in Junior College, the teacher recruitment process is in a very difficult situation, the syllabus is not very good standard, there were no standard of CBSE, the vacancies of teachers are still vacant in various colleges, there are no teachers in many school, many teachers in the city and representatives of teachers ’employees’ union in the Maharashtra Times. 

जुनिअर कॉलेजमध्ये शिकवायला शिक्षक नाही, शिक्षकभरती रखडलेल्या अवस्थेत आहे, अभ्यासक्रम सुमार दर्जाचा असून, सीबीएसई दर्जाचा नाही, शाळांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत, शाळांमध्ये शिपाई नाहीत, अशा अनेक व्यथा शहरातील शिक्षक आणि शिक्षकतेकर कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधिंनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या मटा जाहीरनामा व्यासपीठावर मांडल्या.
या व्यासपीठावर झालेल्या चर्चेत एच. एम. गायकवाड, शिवाजी खांडेकर, प्रसन्न कोतुळकर, संतोष फाजगे, किरण खाजेकर, लक्ष्मण रोडे, अविनाश ताकवले, अनिता साळुंखे आदी उपस्थित होते. राज्यात इयत्ता अकरावीची ऑनलाइल प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू असून, त्याद्वारे विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी अशा सर्वांनाच मनस्ताप होत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने रद्द करून ऑफलाइन पद्धतीने घ्यावी. ज्युनियर कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नसून, शालेय विभागाच्या चुकीच्या निर्णयांमुळे उपनगरांमधील कॉलेजांमधील विद्यार्थी संख्येत कमालीची घट होत आहे. २००३ पासून मंजूर असलेल्या १३०० पदांना मान्यता मिळत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील ज्युनियर कॉलेजांमध्ये ३ ते ५ हजार शिक्षकांची कमतरता आहे. यासोबतच शिक्षकभरती प्रक्रिया अद्याप रखडलेली आहे. त्यामुळे दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अर्हताप्राप्त शिक्षक नाहीत. राज्यातील शाळा व ज्युनियर कॉलेजांमध्ये सुमारे ४५ हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपी पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या शिक्षक-कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. शाळांमध्ये स्वच्छतागृहे नसल्याने मुलींची कुचंबणा होते. ग्रंथालय आणि प्रयोगशाळांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करताना प्रश्न निर्माण होतात. सरकारने रात्रशाळांमध्ये शिक्षक-कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यासाठी सरकारी निर्णय घेतला, मात्र त्याची अंमलबजावणी शून्य आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन कसे करावे आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांनी दैनंदिन आयुष्य कसे जगावे, हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

Teachers New Demand शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

– देशात एकसमान अभ्यासक्रम असावा.

– अभ्यासक्रम तयार करणारे संबंधित विषयाचे तज्ज्ञ असावेत.

– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, बायोलॉजीचा अभ्यासक्रम सीबीएसईचा असावा.

– शिक्षणावर एकूण अर्थसंकल्प तरतुदीच्या ६ टक्के रक्कम खर्च करावी.

– ‘केजी टू पीजी’ सर्वांना एकसमान शिक्षण हवे.

– अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बंद करावी.

– शाळांमध्ये स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधा निर्माण कराव्यात.

– शाळा व ज्युनियर कॉलेजांमध्ये तातडीने पदभरती करावी. अनुकंपा तत्वावर भरती करण्यासाठी प्राधान्य द्यावे.

– वेतन एक तारखेला व्हावे.

– शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षे वेतनश्रेणीवाढ निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करावी.

– ‘समान काम-समान वेतन’ तत्वाचा अवलंब करावा.

– जुनी पेन्शन योजना लागू करा.

– दिरंगाई प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

– शिक्षकेतर कर्मचाऱ्याला मतदानाचा अधिकार मिळावा.
7 thoughts on “Shikshak Bharti 2021 new update”

  1. शिक्षकेत्तर कर्मचारी भरती केव्हा सुरू करणार आहे

    Reply
  2. शिक्षकेत्तर कर्मचारी भरती केव्हा सुरू होईल कोणी सांगु शकता का

    Reply

Leave a Comment