Shikshak Bharti 2023 new update

Maharashtra Shikshak Bharti 2023

Since 2012, no teachers have been recruited by the education department with full amnesty. There are no teachers in state schools. Some have retired. Additional workload has increased on the existing teachers. In this background, the government has started the teacher recruitment process rapidly. 30 thousand vacancies of teachers are being filled through Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT).

 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) द्वारे शिक्षकांच्या ३० हजार रिक्त जागा भरल्या जात आहेत आणि एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यासाठी वर्षातून दोनदा टीएआयटी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली आहे.

 प्रश्नोत्तराच्या तासावेळी उत्तर देताना केसरकर म्हणाले की, आयबीपीएस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन खासगी एजन्सींना भरतीचे काम देण्यात आले आहे. या कंपन्या केंद्र सरकारसाठीही काम करतात आणि त्या विश्वासार्ह आहेत, असे ते म्हणाले. शिक्षक भरती प्रक्रिया एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून पुढील शैक्षणिक वर्षात हे शिक्षक रुजू होतील, असेही त्यांनी सांगितले.

 शिक्षण विभागाकडून २०१२ पासून पूर्ण क्षमेतेने शिक्षक भरती झालेली नाही. राज्यातील शाळांमध्ये शिक्षक नाहीत. काहीजण निवृत्त झाले आहेत. आहेत त्या शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शिक्षक भरती प्रक्रिया वेगाने सुरु केली आहे.


Teachers Recruitment: An important update has come out regarding pending teacher recruitment in the state. Chief Minister Eknath Shinde announced that the posts of more than 30 thousand teachers and center heads will soon be filled in the state. This has given relief to the youth preparing for teacher recruitment. Also, work on shaping the new education policy is going on in parallel.

राज्यात लवकरच ३० हजारांहून अधिक शिक्षकांची आणि केंद्रप्रमुखांची पदे भरली जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच, नवीन शैक्षणिक धोरणाला आकार देण्याचे काम समांतर सुरू आहे. त्यामुळे शाळाबाह्य मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राज्य राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ‘पुढील काळात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असून, पेन्शनसारखा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. तो सोडवण्यासाठी येत्या काळात उपमुख्यमंत्र्यांच्या समन्वयातून चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतो त्यामुळे शिक्षकांवर कुठल्याही प्रकारचे बंधने टाकणार नाहीत. शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे; तसेच विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे’

आताच्या स्पर्धात्मक युगात आपण पुढे गेलो पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेवरील शिक्षणावर भर दिला जाईल व केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण भविष्यकाळातील सुवर्णसंधी असल्याचेही त्यांनी सांगितले. या अधिवेशनाचे प्रस्थाविक राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य अध्यक्ष उदय शिंदे यांनी केले.


Maharashtra Teacher Recruitment 2023 – The Department of School Education and Sports, Government of Maharashtra will soon announce the Maharashtra PRT TGT Recruitment 2023 Notification to fill the Teacher Posts. The official of Maharashtra has released a notification for the Primary/ Secondary Teacher Vacancies. So the officials announced about the vacancies and they asked the interested and eligible candidates to apply for the available vacancies by inviting applications from the candidates

Pavitra Portal – खुशखबर! राज्यातील रखडलेली शिक्षक भरती

 Shikshak Mandhan Vadh – शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे याची अंमलबजावणी रखडली होती. 

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पहील्या तीन वर्षाकरीता मानधन तत्वावर नियुक्ती देणेबाबत शासन निर्णय दिनांक २५.११.२००५ अन्वये निर्णय घेण्यात आला होता. सदर शासन निर्णयानुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले होते.

 •  निवडणुका  पार पडताच याविषयीचा शासननिर्णय जारी करण्यात आला असून १ जानेवारी २०२३ पासून शिक्षकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले.  पात्र शाळांना वाढीव टप्पा घोषित करण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.
 •  मराठीबाबत ग्रेडिंगचा पर्याय शाळांमध्ये मराठी अनिवार्य केले आहे. मात्र ज्यांनी पहिलीपासून मराठी शिक्षण घेतलेले नाही अशांना मराठी अडचणीचे ठरू शकते. यासाठी ग्रेडिंगच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचे केसरकर म्हणाले.
 •  शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनात झालेली वाढ, वाढती महागाई या सर्व बाबींचा विचार करुन शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

 येथे पहा सुधारित मानधन 

GR शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक ११.१२.२०२० नुसार चतुर्थश्रेणी कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर पद व्यपगत करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार शाळांना चतुर्थश्रेणी पदाऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे. तथापि, अनुकंपा तत्वावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागू होत असल्याने या प्रकारे चतुर्थश्रेणी पदावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाच वरील तक्त्यातील मानधन लागू असेल. तसेच जे चतुर्थश्रेणी कर्मचारी दि.११.१२.२०२० पूर्वी चतुर्थश्रेणी संवर्गात सेवक या पदावर नियुक्त करण्यात आले आहेत व ज्यांचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आलेला नाही, त्यांना देखील वरील मानधन अनुज्ञेय राहील.


Shikshak Bharti 2023 online apply

Shikshak Bharti Maha TAIT Exam 2022 Online Apply Link open. Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) – 2022 Exam has been started now. The deadline for online application has been given between 31st January to 8th February for the online exam and this exam will be conducted from 22nd February to 3rd March.

TAIT Exam शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा जाहीर
TET परीक्षा फेब्रुवारी अखेरीस; १० हजार केंद्रांवर होणार परीक्षा

शिक्षक भरती आवश्यक टीईटी परिक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

 1. Maha TAIT Exam 2023 : स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ (टीईटी) परीक्षेसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.
 2. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेसाठी ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली असून, ही परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान आयोजित केली जाणार आहे.
 3. परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी, उर्दू असेल. ही परीक्षा २०० गुणांची असणार आहे. अभियोग्यतेत १२० प्रश्न १२० गुणांसाठी असतील.
 4. बुद्धिमत्ता घटकात ८० गुणांसाठी ८० प्रश्न असणार असून, २०० गुणांसाठी १२० मिनिटांचा वेळ असणार आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर १५ फेब्रुवारीपासून उपलब्ध होतील. परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी अडचणी असल्यास परीक्षा परिषदेने ई-मेल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.

Shikshak Bharti 2023– In the coming new year, 30 thousand teachers and non-teaching staff will be recruited in the state. School Education Minister Deepak Kesarkar has announced that the Finance Department has approved the recruitment of 80 percent of the teachers and 50 percent of the posts will be filled immediately.

Maharashtra Teachers Recruitment 2023

येत्या नव्या वर्षात राज्यात 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. अर्थ खात्यानं शिक्षकांच्या 80 टक्के भरतीला मंजुरी दिली असून त्यापैकी 50 टक्के पदं तातडीनं भरण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. त्याचसोबत, महाराष्ट्रातील कोणतीही शाळा बंद करणार नसून, 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या निव्वळ अफवा असल्याचा खुलासाही दीपक केसरकर यांनी केला आहे.
Maharashtra Shikshak Bharti 2023

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भरती संदर्भात माहिती देताना म्हटले की, “50 टक्के शिक्षक भरती लवकरच केली जाणार आहे. 80 टक्के भरती करता आली असली, पण सध्या आधारकार्ड लिंकिंग सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची निश्चित संख्या ठरेल आणि त्यानंतरच 30 टक्के भरती होईल.” पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, “परवानगी मिळाली तर 100 टक्के भरती करण्याची तयारी शिक्षण विभागाची आहे. डिसेंबर 31 पर्यंत आधार लिंक करण्याचं काम होईल आणि त्यानंतर एक महिन्यानं सर्व कामांचा मेळ घेतला जाईल, पण भरती न थांबवता 50 टक्के भरती ही ताबडतोब केली जाईल, यात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती होईल.” अशी घोषणा केसरकरांनी यावेळी केली आहे. तसेच, नव्या वर्षात 30 हजार प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं आहे.

20 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येणार नाही. तसा शासनाचाही विचार नसल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यामुळे सरकार या शाळा बंद करणार, असा अनेकांचा समज झाला. मात्र, ज्या शाळेत एक विद्यार्थी असेल, त्याला त्या ठिकाणी  योग्य शैक्षणिक वातावरण मिळू शकेल का, हा मुद्दा आहे. त्यामुळे मुलांच्या हिताचा विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटलं. दर्जेदार शिक्षण देणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे मंत्री केसरकर यांनी म्हटलं.


Shikshak Bharti 2023- Education Minister Deepak Kesarkar has announced that more than 75 thousand teachers will be recruited in the state soon. Kesarkar informed that this recruitment will be the largest recruitment in Maharashtra, not just an announcement, but actually filling these posts. Read More details are given below.

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षक भरती करणार असल्याची घोषणा केली. लवकरच राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांच्या पदांची भरती करू, अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली. तसेच केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्षात बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचं काम करणार असल्याचं नमूद केलं. यावेळी दीपक केसरकर शनिवारी सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार;

दीपक केसरकर म्हणाले, “शिक्षक भरती करताना राज्यात किती पदं रिक्त आहेत हेही बघावं लागतं. शिक्षक म्हणजे केवळ शिक्षक असत नाहीत, तर त्यांना गणित, विज्ञान असे विषय असतात. ही गुंतागुंतीची प्रक्रिया असते. आम्ही ज्या शाळांना अनुदान देतो तेथेही अनेक शिक्षक अतिरिक्त झालेले असतात. त्या सर्वांचं समायोजन करून लवकरच भरती केली जाणार आहे.”

ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती असणार”

“ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाचवेळी 75 हजारांहून अधिक पदांची भरती करण्याची घोषणा केली आहे. केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष ही पदं भरायची आहे यावर कॅबिनेट बैठकीतही चर्चा झाली आहे,”अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली.


Shishkak Bharti 2023: In government schools in the state there is a total of 18 thousand 204 teacher posts are vacant. As per the central government report shows that 18 thousand 204 posts of teachers are vacant, in reality four years ago CAG said that 32 thousand posts were vacant. Therefore, it is estimated that the number of these vacancies should be around 30 thousand. Read More details about Shikshak Bharti 2022 are given below.

शिक्षक भरती नवीन अपडेट- तब्बल १८ हजार २०४ शिक्षकांची पदे रिक्त

राज्यातील सरकारी शाळांमध्ये तब्बल १८ हजार २०४ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे केंद्रीय शिक्षण मंडळाच्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या २०२२-२३ च्या अहवालातून समोर आले आहे. ही रिक्त पदे भरण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचेही म्हटले आहे. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने लाखो विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणे कठीण झाले असून यासाठी सरकारने शिक्षकांची पदे भरण्यासाठीची कार्यवाही करावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील कार्यरत स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींकडून केली जात आहे.

 • केंद्र सरकारच्या अहवालातून १८ हजार २०४ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे दाखवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात चार वर्षांपूर्वी कॅगने ३२ हजार पदे रिक्त असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या रिक्त जागांचा आकडा सुमारे ३० हजारांच्या दरम्यान असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 • राज्यात आजमितीला सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित, विनाअनुदानित आदींकडून चालविण्यात शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये सात लाख ८३ हजार ८४७ शिक्षक कार्यरत आहेत. या शाळांमध्ये एकूण दोन कोटी २१ लाख ७४ हजार ६२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
 • सरकारीसह सर्वच शाळांमध्ये शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार प्रति ३० विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असणे आवश्यक आहे, मात्र उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिकच्या शाळांमध्ये अनुक्रमे ३१.४९ आणि ३६.९६ प्रतिविद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षक उपलब्ध आहेत.
 • त्यामुळे पाच लाख ४० हजार विद्यार्थी शिक्षकांविना शिक्षण घेत असून ही गंभीर बाब असल्याचे ‘सिस्कॉम’चे अध्यक्ष व शिक्षण तज्ज्ञ राजेंद्र धारणकर यांनी म्हटले आहे.

राज्यातील शाळांमधील विद्यार्थी संख्या

(एकूण शाळा १ लाख १० हजार २२९)

वर्ग- विद्यार्थ्यांची संख्या

 • पहिली १८,९९,४७०
 • दुसरी १९,७७,२१३
 • तिसरी १९,७७,२१३
 • चौथी २०,०५,५३६
 • पाचवी १९,९८,९६६
 • सहावी १९,७४,०२४
 • सातवी १९,५०,८२८
 • आठवी १९,२३,१८२
 • नववी १९,०८,९२६
 • दहावी १७,९६,०३०
 • अकरावी १३,५४,३८३
 • बारावी १४,२१,६९४
  • एकूण २,२१,७४,६२५ 

Maharashtra Shikshak Bharti 2023- Vacancy Details

Sr. No District  No. of Vacancy 
1. Ahmednagar  347
2. Akola  288
3 Amravati   320
4 Aurangabad  569
5 Beed  441
6 Bhandara 308
7 Buldhana 173
8 Chandrapur 204
9 Dhule  321
10 Gadchiroli  265
11 Gondia  291
12 Hingoli  87
13 Jalgaon  363
14 Jalna  203
15 Kolhapur  972
16 Nagpur  769
17 Nanded  732
18 Nandurbar 345
19 Nashik  531
20. Palghar  1916
21 Yavatmal  1307
22  Parbhani  346
23  Pune  161
24 Raigad  1051
25 Ratnagiri  848
26 Sangli  666
27 Satara  1023
28  Sindhudurg  576
29 Solapur  484
30 Thane  541
31 Wardha  204
32 Washim  123
  Total  16, 748

Shikshak Bharti 2023: Teacher recruitment in Maharashtra will now be done according to the new system. Teacher recruitment in the state will be done through MPSC. Now the proposal to implement the recruitment process of teachers through MPSC has been submitted to the government by the Commissionerate of Education. Soon teachers will be recruited in the state..

गेल्या काही महिन्यांपासून पवित्र पोर्टल व शासनाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत करण्यात येत असलेली राज्यातील शिक्षकांची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या धर्तीवर करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.

शिक्षक भरती आता नव्या पद्धतीनुसारच होणार!

 • मात्र शिक्षकांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबवण्यासाठी काही तांत्रिक बदल आवश्यक असून, या बदलांची पूर्तता करून पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे
 • राज्यात २०१२ मध्ये शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठया प्रमाणात रिक्त आहेत. शिक्षक भरतीची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून सातत्याने करण्यात येत असल्याने २०१९ मध्ये १२ हजार पदांची भरती पवित्र संकेत स्थळामार्फत सुरू करण्यात आली.
 • भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी पवित्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले. या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने ही प्रक्रिया लांबली आहे. सध्या खासगी अनुदानित संस्थांतील शिक्षकांची पदे मुलाखतीद्वारे भरण्याचा टप्पा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता एमपीएससीमार्फत शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.
 • एमपीएससीमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यामार्फत शिक्षकांची भरती एमपीएससीमार्फत करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. या प्रस्तावाबाबत शिक्षण सचिव, एमपीएससीचे अध्यक्ष यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
 • मात्र एमपीएससीमार्फत शिक्षकांची भरती करण्यासाठी सध्याच्या नियमांमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे बदल करण्याची प्रक्रिया होईपर्यंत सध्या सुरू असलेली भरती प्रक्रियाही पूर्ण होईल. त्यामुळे पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

Shikshak Bharti 2023: Despite the absence of additional teachers in the higher secondary education department, recruitment for the last ten years has been consistently delayed. As a result, there are 5,000 vacancies for junior college teachers in the state. The Maharashtra State Junior College Teachers’ Federation has demanded that the state government should immediately fill the vacancies of teachers and complete the recruitment process during the summer vacation so that teachers can be made available in colleges in the coming academic year.

उच्च माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षक अतिरिक्त नसतानाही गेली दहा वर्षे सातत्याने भरतीसाठी विलंब केला जात आहे. परिणामी राज्यात पाच हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. राज्य सरकारने शिक्षकांची ही रिक्त पदे त्वरित भरावीत, ही शिक्षक भरती प्रक्रिया उन्हाळ्याच्या सुटीत पूर्ण करावी, जेणेकरून येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांमध्ये शिक्षक उपलब्ध होऊ शकतील, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे.

राज्यात गेली १० वर्षे शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळे आदेश देऊन शिक्षकांची भरती प्रलंबित राहत आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात काही शिक्षक अतिरिक्त असले तरी उच्च माध्यमिक शिक्षण विभागात मात्र पाच हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शासनाने या जागांवर शिक्षक भरण्यासाठी परवानगी नाकारल्यामुळे शिक्षकांच्या अनुपस्थितीत विद्यार्थी अभ्यास करून परीक्षा देत आहेत. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन करावे लागल्यामुळे शिक्षकांची कमतरता प्रकर्षाने जाणवली नाही, परंतु गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षक नसल्यामुळे वर्ग रिकामे असल्याचे महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.

प्रा. आंधळकर म्हणाले,‘‘बोर्डाचे पेपर तपासणीसाठी शिक्षक पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने शिक्षकांना जास्त उत्तरपत्रिका तपासाव्या लागल्या आहेत. दरम्यान, शासनाने ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षकांची भरती करण्याचे कार्य सुरू केले होते, परंतु ही प्रक्रिया देखील थांबली. त्यामुळे आता राज्य सरकारने शिक्षकांच्या किती जागा रिक्त आहेत, याची त्वरित माहिती घ्यावी आणि उन्हाळ्याच्या सुटीत शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी.’’ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक भरती प्रक्रिया त्वरित राबविण्याच्या मागणीचे निवेदन महासंघातर्फे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना देण्यात आले आहे.


Shikshak Bharti 2023 new update

In Barshi taluka including Koregaon, the movement to fill the vacancies of teachers in 18 Zilla Parishad schools has gained momentum. . Immediate action will be taken to fill the vacancies of teachers in the school and the inconvenience will be removed by filling the vacancies. Teacher recruitment will be done soon in Koregaon. Read More details as given below.

कोरेगाव (ता, बार्शी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकाच खोलीत चार इयत्तांचे वर्ग चालवण्याची जबाबदारी एकाच शिक्षकावर आहे. कोरेगावसह बार्शी तालुक्यात 18 जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याबाबतच्या हालचालींना गती आली आहे. मात्र. तातडीने शिक्षक न दिल्यास कोरेगाव जि. प शाळेला 4 मार्च रोजी कुलूप ठोकण्याच्या निर्णयावर ग्रामपंचायत व ग्रामस्थ ठाम आहेत.

शिक्षक भरती 2023 -राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच

कोरेगावसह तालुक्यातील अठरा जि. प शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी तातडीने कार्यवाही करून जागा भरून गैरसोय दूर केली जाईल. कोरेगाव येथेही लवकरच शिक्षक येईल.”

Palghar District Shikshak Bharti 2023 updates : In Palghar district, only 2212 posts are vacant in the primary department. It has 1651 teachers. There are 262 vacancies for headmasters. Also 3 out of 4 posts in group A and B are vacant.  As per the latest news provided by the Education Officer Primary at Palghar District that the recruitment process work was now in its final stages for teachers, extension officers and headmasters etc. In the recruitment of teachers in PESA, 1651 posts of teachers from Scheduled Tribes are vacant. These posts have remained vacant due to non-meeting of candidates. These posts will be filled if candidates are received. There are 35 vacancies in category 2 and 20 vacancies in category 3 in the district. There are 81 vacancies for the post of Center Head. He said some of the proposals have been sent to the government while others are in the process.

शिक्षणसेवकांचे मानधन वाढवणार

पालघर जिल्हा पेसा क्षेत्र शिक्षक भरती अपडेट्स

 • पालघर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी माहिती दिली की, भरती ही सरळ आणि पदोन्नती मार्गाने केली जाते. त्यात शिक्षक, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक यांची बिंदू नामावलीच तयार झाली नसल्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती. आता त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
 • पेसा मधील शिक्षक भरती मध्ये अनुसूचित जमाती मधील १६५१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
 • उमेदवार भेटत नसल्याने ही पदे रिक्त राहिली आहेत. उमेदवार प्राप्त झाल्यास ही पदे भरली जातील. तर जिल्ह्यात विस्तार अधिकारी श्रेणी २ मधील ३५ पदे तर श्रेणी ३ मधील २० रिक्त आहेत.
 • केंद्र प्रमुखाची ८१ पदे रिक्त आहेत. यातील काहींचे प्रस्ताव शासनाला पाठवले आहेत तर काहींची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 • पालघर जिल्ह्यात केवळ प्राथमिक विभागातील २२१२ पदे रिक्त आहेत. यात १६५१ शिक्षक आहेत. तर २६२ मुख्याध्यापक पदे रिक्त आहेत. तसेच अ आणि ब गटातील ४ पदांपैकी ३ पदे रिक्त आहेत. यामुळे जर शिक्षकच नसतील तर मुलांना शिक्षणाचे धडे कोण देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Vacancy Details of Shikshak in Palghar – रिक्त पदे

 • पदाचे नाव                              मंजूर पदे       रिक्त जागा    
 • विस्तार अधिकारी श्रेणी                     २५०          ३५
 • विस्तार अधिकारी श्रेणी                     ३२१          २०
 • मुख्याध्यापक                                  ३७१          २६२
 • शिक्षक : — वर्गानुसार                      —           —
 • अनुसूचित जाती                               १२२          ७१
 • अनुसूचित जमाती (पेसा)                 ६१५८         १६५१
 • अनुसूचित जमाती (नॉन पेसा)           ६६           ७१
 • वि. जा. अ.                                        २८           ०४
 • भ. ज. ड.                                          १९           ४३
 • भ. ज. ब.                                          २३           ०४
 • भ. ज. क.                                         ३३           ०५
 • वि. मा. प्र.                                        १९           १५
 • इतर मागासवर्गीय                           १७८          ७६
 •   खुला                                            ४५१          १४

प्राध्यापकांच्या 3064 रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच सुरु

ZP शिक्षक भरती 2021- 23 हजार जागा रिक्त

पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती अखेर सुरु!!

लवकरच शिक्षक भरती ५८०० जागा रिक्त

7 thoughts on “Shikshak Bharti 2023 new update”

 1. शिक्षकेत्तर कर्मचारी भरती केव्हा सुरू करणार आहे

  Reply
 2. शिक्षकेत्तर कर्मचारी भरती केव्हा सुरू होईल कोणी सांगु शकता का

  Reply

Leave a Comment