Shikshak Bharti Pavitra Pranali Portal

Shikshak Bharti Pavitra Pranali Portal

Maha TET नोंदणीला आज पासून सुरुवात …! येथे संपूर्ण वाचा आणि ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करा…

‘पवित्र प्रणाली’ रद्दसाठी संस्थाचालकांची खटाटोप!

Shikshan Bharti 2021 : There has not been a process for recruitment of teachers in the state since 2010. Then it was decided by the sacred system to implement the recruitment process in schools in the governing, private, local self-government institutions, but even though it got tangible, it has been partially processed. In the first phase, the selection list for the recruitment of teachers has been announced in five thousand 855 seats.

शिक्षक भरतीत पहिला टप्प्यातील शिक्षक रुजू झाले. मात्र, दुसरा टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. तत्कालीन सरकारने घोषणा केलेल्या बारा हजार शिक्षक भरतीचे काय असा प्रश्न डीटीएड, बीएडधारकांना पडला. त्यातच आता पवित्र प्रणालीच रद्द करण्याचा खटाटोप संस्थाचालकांकडून केला जातो आहे. त्यात शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी पद्धत बंद करण्याची मागणी केली. संस्थाचालकांचा या खटाटोपाला बेरोजगार उमेदवारांनी कडाकडाडून विरोध केल्याचे चित्र आहे.

राज्यात २०१० नंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया झालेली नाही. त्यानंतर पवित्र प्रणालीद्वारे शासकीय, खासगी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमध्ये भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु त्याला मूर्त रूप मिळाले असले तरी अर्धवट प्रक्रिया झाली आहे. पहिल्या टप्प्यातील पाच हजार ८२२ जागांवर शिक्षक भरतीसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली. सुरुवातीपासून संस्थाचालकांचा विरोध असल्याने काही दिवस कोर्टात अडकलेली प्रक्रिया मार्गी लागली. त्याच दरम्यान विधानसभा निवडणुकांमुळे प्रक्रिया अडखळली. नवीन सरकार स्थापन झाले, परंतु दुसऱ्या टप्प्यातील भरतीची प्रक्रिया कधी असा प्रश्न बेरोजगारांना पडला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त जागांवर शिक्षक भरती करण्यात आली. खासगी संस्थांवरील मुलाखत यादी तयार आहे. आता ही प्रक्रियाच रद्द करण्याचा खटाटोप सुरू असल्याचे कळते. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भरती प्रक्रियेत संस्थाचालकांचा हस्तक्षेप, गैरप्रकार थांबविण्यासाठी प्रणाली आणली गेली. आता तीच बंद करून पुन्हा भरती प्रक्रिया करण्याची मागणी संस्थाचालकांमधून होते आहे.

शिक्षक आमदारांचेच पत्र

शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी जयंत पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये पवित्र प्रणाली रद्द करून शिक्षक भरती सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यामागणीमुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारची मागणी चुकीची असून संस्थाचालकांच्या मनमानीला खतपाणीला घालणारी आहे, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण आयुक्तांची भेट घेऊन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी करणार असल्याचे उमेदवारांनी ‘मटा’ला सांगितले.

1 thought on “Shikshak Bharti Pavitra Pranali Portal”

Leave a Comment