SSC, HSC Timetable Announced

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्याचा निर्णय

Maharashtra Board HSC, SSC Exam 2021: MSBSHSE Class 10th, 12th Exam 2021 in Maharashtra will be held in May instead of March due to Corona epidemic. After Deepawali, preparations are being made to open schools in entire Maharashtra including Mumbai. Firstly classes will be started from 9th to 12th. Maharashtra Education Minister Varsha Gaikwad said that after November 23, students of 9th and 10th can start coming to school after the approval of parents.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाले की, राज्यातील शाळा साधारणत: १ जूननंतरच सुरू होतात.  १२ वी परीक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आणि १० मार्चपासून सुरू झाली होती, परंतु यावर्षी कोरोना  साथीने शाळा सुरू झालेल्या नाहीत. आम्ही ऑनलाईन, टेलिव्हिजन व इतर मार्गाने मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला

महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी दीड ते दोन महिने लागतात, म्हणून परीक्षा मे महिन्यात घेण्यात येतील. बोर्डाच्या परीक्षा मे महिन्यात घेतल्या जातात कारण मे नंतर पाऊस पडण्यास सुरवात होते आणि परीक्षा थांबल्यामुळे नवीन सत्रात शाळा सुरू होण्यास विलंब होतो. या सर्व कारणांमुळे मे महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 


SSC, HSC Timetable 2019 – 2020 : 10th, 12th Board examinations to be taken by the Maharashtra State Secondary and Higher Secondary Education Board has been announced timetable. Accordingly, to that the Class 12th exams will started from February 18, 2020 and Class 10th exams will started from March 3, 2020.

A total of 9 departmental boards will be conducted Class X, XII examinations simultaneously through Pune, Nagpur, Aurangabad, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik, Latur & Konkan. A probable schedule of exams was released on the official website of the State Board. They were invited in writing suggestions on notice. 

बारावीची परीक्षा दि.18 फेब्रुवारीपासून; दहावीची परीक्षा 3 मार्चला सुरू होणार 

राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर कोकण या एकूण 9 विभागीय मंडळामार्फत एकाच वेळी दहावी, बारावीच्या परीक्षा होणार आहेत. राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावर लेखी स्वरुपात सूचना मागविण्यात आल्या होत्या. संघटना, पालक, शिक्षक यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्या. त्यानुसार परीक्षांसाठी संभाव्य वेळापत्रकच निश्‍चित करण्यात आलेले आहे. दिनांकनिहाय सवीस्तर अंतिम वेळापत्रक राज्यमंडळाच्या संकेतस्थळावर सोमवारी (दि.18) उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला सुरू होणार असून ती 18 मार्च रोजी संपणार आहे. दहावीची परीक्षा 3 मार्च रोजी सुरू होणार असून 23 मार्च रोजी संपणार आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे.

छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करूनच विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ठ व्हावे लागणार आहे. मंडळाव्यतिरिक्त अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले व व्हॉट्‌स ऍप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे राज्यमंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

सौर्स : दैनिक प्रभात
Leave a Comment