ST Mahamandal Bharti 2021

ST Mahamandal Bharti 2021

एसटी महामंडळात होणार सर्वात मोठी भरती..

कोल्हापूर मध्ये एसटीचे 120 कर्मचारी नेमणूकीच्या प्रतिक्षेत

Two years ago, the ST Mahamandal started the recruitment process for the post of Driver-Conductor across the Maharashtra state. After two years of hard work, he was selected as a carrier-driver in ST Corporation last year. There were about 3500 vacancies in the state and 383 seats in Kolhapur division. It was the first written exam. The youths who passed the test were tested to drive the bus. After that, 250 youths became eligible through medical examination. Training is imparted in ST Corporation before application. Heavy vehicle licenses are given to those who have completed three years of training, while those who have completed this period are given 84 days of training. Accordingly, these youths were trained by dividing them into 30 groups in each group. Read the more details given below:

दोन वर्षापुर्वी राज्यभरात महामंडळाने चालक-वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविली. दोन वर्षांच्या अथक मेहनतीमुळे एसटी महामंडळात वाहक-चालक म्हणून गतवर्षी निवड झाली. राज्यात सुमारे 3500 तर, कोल्हापूर विभागात 383 जागा होत्या. त्यात पहिल्यांदा लेखी परीक्षा झाली. त्यातील उत्तीर्ण युवकांची बस चालवण्याची चाचणी झाली. त्यानंतर वैद्यकिय तपासणीतून 250 युवक पात्र ठरले. रूजू होण्यापुर्वी एसटी महामंडळात प्रशिक्षण दिले जाते. अवजड वाहन परवाना तीन वर्षे पूर्ण असलेल्यांना 48 तर, हा कालावधी पुर्ण नसऱ्यांना 84 दिवस प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार या युवकांची प्रत्येक गटात 30 या प्रमाणे विभागणी करून प्रशिक्षण झाले.

प्रशिक्षण पुर्ण होण्यास अवघे तीन दिवस असताना लॉकडाऊन सुरु झाल्याने गेल्यावर्षी नियुक्तीची सर्वच प्रक्रिया खोळबंली. प्रशिक्षणानंतर मोठा खंड पडल्यामुळे निवड झालेल्या युवकांना फेब्रुवारी ते मार्च महिन्यात पुन्हा 15 दिवस उजळणी प्रशिक्षण पुर्ण करावे लागले. नोकरीचे स्वप्न साकार होणार म्हणून जिद्दीने मन लावून प्रशिक्षणात सहभाग घेतला. पण, प्रशिक्षण पुर्ण होण्यास केवळ तीन दिवस शिल्लक असतानाच लॉकडाउन झाले. त्यामुळे दुर्देवाने हाता-तोंडाशी आलेला नोकरीचा घास हिरावला. यंदा पुन्हा नव्या उमेदीने पंधरा दिवसांचे उजळणी प्रशिक्षण पुर्ण केले. मात्र, कोल्हापूर विभागातील अद्यापही या 120 जणांना नियुक्तीपत्रे देऊन हजर करून घेतलेले नाही. त्यातच पुन्हा कडक लॉकडाउनचे संकेत असल्याने या वाहक-चालकांचा जीव टांगणीला लागला आहे.

Many posts are being filled in the Yavatmal division of Maharashtra State Road Transport Corporation. ST is also suffering financial loss. Many tasks are being delayed as the person in charge is not fulfilling his responsibilities. It is said that the staff also suffered due to this. The corporation did not even have the facility to pay the employees. Salaries were paid after the government paid. Efforts need to be made to increase revenue once the transport system is streamlined. But many officials are not serious about this. Many bus services are canceled from some depots. Read the complete details carefully given below:

एस.टी. महामंडळातील अनेक पदे प्रभारावर

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात अनेक पदांचा कारभार प्रभारावर हाकला जात आहे. या सर्व प्रकारात नियोजनाचा बोजवारा उडत असतानाच एस.टी.चे आर्थिक नुकसानही होत आहे. प्रभारी व्यक्ती जीव ओतून जबाबदारी पार पडत नसल्याने अनेक कामांचा खोळंबा होत आहे. यामुळे कर्मचारीवर्गही त्रस्त झाला असल्याचे सांगितले जाते.




महामंडळाच्या उत्पन्नाचा स्रोत असलेल्या वाहतूक विभागाचा कारभारही प्रभारी व्यक्तीवर चालविला जात आहे. विभागीय वाहतूक अधिकारी हे पद गेली अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. शिवाय, विभागीय वाहतूक अधीक्षक (अपराध) या पदालाही प्रभाराचे ग्रहण लागले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिल्यास प्रवाशांना ताटकळत राहावे लागत नाही. ऐनवेळी फेऱ्या रद्द कराव्या लागत नाही. वेळेवर वाहतूक सुरू राहते. मात्र जिल्ह्याच्या काही आगारांमध्ये फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

राळेगाव, वणी याठिकाणी आगार प्रमुख नाही. हे दोनही आगार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. दिवस ढकलण्यापुरता कामगिरी करणारे अधिकारी काही ठिकाणी आहे. बसस्थानक प्रमुख, वाहतूक निरीक्षक, विभागीय लेखागार ही पदेसुद्धा रिक्त आहेत. वरिष्ठांसाठी असलेल्या पदांवर कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी काम करत आहे. परिणामी महामंडळाची आर्थिक बाजू आणखी दुबळी होत चालली आहे.

वैश्विक महामारी कोरोनाचा मोठा दणका लालपरीला बसला. कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याची सोयही महामंडळाकडे नव्हती. सरकारने पैसा दिल्यानंतर पगार झाले. वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. परंतु याविषयात अनेक अधिकारीवर्ग गंभीर नसल्याचे दिसून येते. काही आगारातून अनेक बसफेऱ्या रद्द होतात. अवघ्या पाच ते सात मिनिटांच्या अंतरात एकाच मार्गावर चार ते पाच बसेस धावतात. आठ-दहा प्रवासी घेऊन आगारातून निघालेल्या या बसेसला शेवटच्या थांब्यापर्यंतही पूर्ण प्रवासी मिळत नाही. यात नियोजनाचा अभाव दिसून येतो.


MSRTC Nanded invited online application from various Trade. A total of 56 posts will be filled online as apprentices (trainees) for various occupations for the session 2021 at Maharashtra State Road Transport Corporation Nanded Division Nanded. These include Mechanical-36, Electron-6, Sheet Metal Works-10, Painter-1, Welder (Gas and Electric) -1, Engineering Graduate / Diploma-2. Read the given detail carefully…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ट्रेनी पदांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग नांदेड येथे सन 2021 या  सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायाकरिता शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणून एकुण 56 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. यात यांत्रिक-36, विजतंत्री-6, शिट मेटल वर्क्स-10, पेंटर-1, वेल्डर (गॅस ॲन्ड इलेक्ट्रीक)-1, अभियांत्रिक पदवीधर/पदवीका-2 या पदांचा समावेश आहे

ST Mahamandal Bharti updates

.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात शिकाऊ उमेदवारांसाठी 56 प्रशिक्षणार्थी पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

  1. आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांनी सर्वप्रथम www.apprenticeshipindia.org व अभियांत्रिकी पदवीधर/पदवीकाधारक उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करुन MSRTC Division Nanded या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
  2. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर राज्य परिवहन नांदेड विभागाचा  विहित नमुन्यातील छापील अर्ज भरुन सादर करावा. कार्यालयाचे छापील नमुन्यातील अर्ज भरुन देण्याची मुदत बुधवार 6 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत आहे. हा छापील अर्ज विभागीय कार्यालय,
  3. कर्मचारी वर्ग शाखा राप नांदेड येथे बुधवार 6 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत शनिवार व सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत मिळतील व लगेच स्विकारले जातील.
  4. या अर्जाची किंमत (जीएसटी 18 टक्के सहीत) खुल्या प्रर्वगाकरिता 590 रुपये तर मागासवर्गीयासाठी 295 रुपये आहे, अशी माहिती राज्य परिवहन नांदेडचे विभाग नियंत्रक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सोर्स: सकाळ


एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; एक महिन्याच्या पगारासह बोनस – राज्य परिवहन महामंडळातील ९७ हजार कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या थकीत वेतनापैकी ऑगस्टचे वेतन व दिवाळी बोनस त्यांच्या बँक खात्यात आजपासून जमा केले जाईल. दिवाळीसाठी अग्रीम हवा असलेल्यांना तातडीने दिला जाईल. उर्वरित २ महिन्यांच्या वेतनापैकी एक वेतन दिवाळीपूर्वी दिले जाईल. बाकी वेतनासाठी शासनाकडे निधीची मागणी केल्ल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

राज्यातील राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबाबत आता कामगार आयुक्तांनी चौकशीचे आदेश आदेश दिले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले आहेत. दरम्यान, पगार न दिल्याने कायद्याचा भंग होत असल्याचं निदर्शनास आले आहे. या कारणामुळे राज्य परिवहन मंडळाला म्हणजेच ST मंडळाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली आहे. मुंबईतील मुख्य कामगार आयुक्तांनी ही नोटीस पाठवली आहे. गेल्या तीन महिन्यांचे ST कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले आहेत. पगार मिळावा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलने केलीत. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. दरम्यान, कोणत्याही प्रकारची पावलेही उचलली जात नसल्याने राज्य परिवहन मंडळाशी निगडित संस्थांनी आपापल्या विभागीय कामगार आयुक्तांचे दरवाजे ठोठावले होते. प्रत्येक विभागाने आपापल्या विभागीय कामगार आयुक्तांच्या भेटी घेतल्यानंतर आता मुंबईतील मुख्य कामगार आयुक्तांनी याप्रकरणी विभागवार चौकशी करून विभागवार बैठक लावल्या. -सौर्स : सकाळ

MSRTC Recruitment 2021 : ST Mahamandal is going to recruiting employees in large amount. However, in the last two years, there were vacancies in the ST Mahamandal but no appointments were made. This has created 15,000 vacancies. It has a large number of vacancies, mainly for drivers and carriers. Earlier in 2014, there was a big recruitment in ST Corporation. However, no vacancy was filled in the two years from 2014 to 2016. Read the details carefully give below and keep visit us for the further updates. 

एसटी महामंडळात मोठी नोकर भरती होणार आहे. मात्र मागील दोन वर्षात महामंडळात रिक्त जागा झाल्या होत्या मात्र त्यावर नेमणुका केल्याच नाहीत. त्यामुळे 15 हजार रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत. यातमध्ये प्रामुख्याने चालक, वाहकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. याअगोदर 2014 साली एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. मात्र 2014 ते 16 या काळात दोन सालात एकही जागा भरली नाही.

एसटी महामंडळासाठी वर्ग-1 ते वर्ग-4 साठी 1 लाख 26 हजार 115 जागा मंजुर आहेत. तर यात 1 लाख 4 हजार 398 मुष्यबळच सध्या कार्यरत आहे. हे पाहता एकूण 22 हजार 24 हजार जागा रिक्त असून यामध्ये 6 हजार 902 ही बढतीतील पदे तर 15 हजार 122 सरळ सेवेतील परिक्षा घेऊन भरण्यात येणार्‍या पदांचा समावेश आहे.

तर यावेळी सरळ सेवेत असणार्‍या पदांमध्ये चालक, वाहकांसह कारागिर, सहाय्यक कारगिर यांची पदे मोठी आहेत. सध्या 36 हजार 732 चालक असून आणखी 2 हजार 977 चालकांची गरज आहे. तर 34 हजार 807 वाहक कार्यरत असून आणखी 3 हजार 963 वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे. कारागिर, सहाय्यक कारागिर यांचीही 5 हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-4 मधील अन्य काही पदेही रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर मोठी भरती असल्याने यातील भरती योग्य व्हावी याकरिता म्हणून एका खाजगी कंपनीला कंत्राट दिले आहेत.

सौर्स: वेबदुनिया


ST Mahamandal Bharti 2021 New Update: MSRTC Bharti 2020 is announced to recruit many vacancies in the department of the Maharashtra State Road Transport Corporation. This recruitment is conducting for the post of Public Relations Officer, those who want to do the job in MSRTC Recruitment can apply by offline mode till 3rd October 2020 for MSRTC Mumbai Recruitment job. The employment place for this posts is Mumbai. For more information regarding this recruitment follow below link

MSRTC Recruitment 2021-नवीन जाहिरात

ST Mahamandal Bharti 2021: The Candidates who are preparing for the MSRTC Exam 2020 (ST Mahamandal) are now searching for the MSRTC syllabus and Exam Pattern 2020. The official website provided the Syllabus and exam pattern. The Direct link for downloading the MRTC Syllabus and Exam Pattern is given below on this page. The Maharashtra RTC Exam paper consists of General Awareness, Quantitative Aptitude, Reasoning, English language. The exam is conducted on online mode. Read Below information:

एसटीच्या सरळसेवा भरतीवरील स्थगिती उठवली-Important Update

MSRTC एसटी महामंडळ च्या येणाऱ्या 2021 लेखी परीक्षेसाठी आवश्यक माहिती 

महाराष्ट्र राज्य आरटीसी अभ्यासक्रम 2021 चे विषय जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा आणि आम्ही सर्व विषयनिहाय विषय दिले आहेत, जेणेकरून आपल्यासाठी परीक्षेची नीट प्रयत्न करणे हे खूप सोपे होईल.

एमएसआरटीसी भरती 2021 साठी लेखी परीक्षा पॅटर्न :

S. NoTopics NameMediumQuestionsMarksExam Duration
1MarathiMarathi50251 Hour 30 Minutes
2EnglishEnglish5025
3General StudiesMarathi5025
4MathematicsMarathi5025
Total200 Q100 M90 Minutes


एसटीची टेरिंग आता महिलांची हाती

ST Mahamandal Female Recruitment 2021 : As per the news published in Maharashtra Times the Female Driver Recruitment will be held soon. In all over the Mahahrashtra 163 Female candidates were selected as a driver. Driving training is being provided to these women in different sections of the state. Training of women directors in Nashik and Dhule division is being given at Aurangabad. After a year of training, these women will be seen on duty in different departments.

ST Mahamandal Female Recruitment 2021

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आता बसचालक म्हणून महिला दिसणार आहेत. राज्यभरात १६३ महिलांची यासाठी निवड करण्यात आली असून, त्यात नाशिक विभागाच्या १० महिला असणार आहेत. राज्यातील वेगवेगळ्या विभागात या महिलांना ड्रायव्हिंगची ट्रेनिंग दिली जात आहे. नाशिक व धुळे येथील विभागातील महिलाचालकांना औरंगाबाद येथे ट्रेनिंग दिले जात आहे. वर्षभराचे प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला वेगवेगळ्या विभागात ‘ऑन ड्युटी’ दिसणार आहेत.

राज्य परिवहन महामंडळाने या महिलांना सामावून घेण्यासाठी ज्यांच्याकडे हलक्या वाहन चालविण्याचा परवाना आहे, त्यांची निवड केली. त्यात त्यांनी मोठे वाहन चालविण्याच्या परवानासाठी अर्ज केल्याची अट ठेवली. त्यानंतर या महिलांची निवड करण्यात आली. या महिलांना आता एसटीच प्रशिक्षण औरंगाबाद येथे ट्रॅफिक इन्स्पेक्टर अनंत पवार हे देत आहे. या प्रशिक्षणात औरंगाबाद विभागाच्या दहा, तर धुळे विभागाच्या ११ महिला आहेत. एकूण ३२ महिलाचालकांना येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राज्यात यवतमाळ जिल्ह्यात याची सुरुवात अगोदर झाली. त्यानंतर पुणे, अमरावती विभागात हे प्रशिक्षण देणे सुरू करण्यात आले. याअगोदर एसटीच्या कंडक्टर म्हणून महिलांना संधी देण्यात आली आहे. आता चालकही महिला असणार आहेत.

असे होईल प्रशिक्षण

वर्षभराचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिलाचालकांची संगणीकृत ड्रायव्हिंग टेस्ट होईल. चाचणीत ते पास झाल्यानंतर एक महिना अंतर्गत प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची भरती एसटीमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे या प्रशिक्षणात या महिलांना कठोर परिश्रम करावे लागणार आहेत.


MSRTC Recruitment 2021 : State Road Transport Corporation (ST) drivers and conductor will be recruited. The application for this will start from 15th February and will fill the seats of 3 thousand 6 drivers in different districts of the state. candidates should be pass 10th class examine and he should have a heavy vehicle license. Complete details are as below:

MSRTC Recruitment 2021 एसटीत चालक, वाहकांची होणार भरती

पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) चालक व वाहकांची भरती होणार आहे. यासाठी 15 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून राज्याच्या विविध जिल्ह्यात 3 हजार 6 चालक-वाहकांच्या जागा भरणार आहेत.

एसटीच्या ताफ्यात बसची संख्या वाढत असताना चालक-वाहकांअभावी खोळंबा होत होता. यामुळे, महामंडळाने चालक-वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये, उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 10 वी पास, अवजड वाहन चालविण्याचा परवाना, आरटीओचा चालक-वाहकांसाठी असलेला बॅच आवश्‍यक आहे. तसेच, महिलांना वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट नसून पुरुष उमेदवारांसाठी 1 वर्ष अनुभवाची अट आहे. या भरतीत 24 ते 38 वयाची मर्यादा असून सर्वसाधारण उमेदवारांसाठी 600 रुपये तर, मागासवर्गीय व दुष्काळग्रस्तांसाठी 300 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

सौर्स : प्रभात


MSRTC Recruitment 2021 : ST Mahamandal will be announce the Maha Bharti this year. As per the latest news from the last two years there have been vacancies in the ST Mahamandal but they have not been appointed. Therefore, 15,000 vacancies have been created It has a large number of vacancies, mainly drivers, conductor. Earlier in 2014, there was a large recruitment of ST corporations. However, between 2014 and 2016, no seats were filled in two years. Read the more details which is given below, Keep visit us…




50 thoughts on “ST Mahamandal Bharti 2021”

Leave a Comment