State Board Recruitment Exam 2020

State Board Recruitment Exam 2020

राज्य मंडळाच्या पदभरती परीक्षेत गैरप्रकार

Maha HSSC Recruitment 2020 : Maha State Board published the recruitment advertisement for Juniour Lipik posts – 266 vacancies in last month. This Recruitment process held through mahapariksha.com. The Main Examine for this recruitment was held in last month and the results for the same also declared. This result is likely to cause widespread misconduct. The exam is conducted online and in the morning and afternoon sessions through the portal. The exams were confusing for a number of technical reasons. Some exam centers had to cancel the exam. The result of these candidates is 200 out of 194 marks, while those who take the exam like the State Service Main Exam can not get the same score. Read the complete details carefully and keep visit us for further updates.

Maha HSSC Recruitment 2020

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी घेतलेल्या ‘ऑनलाइन’ परीक्षेच्या निकालात गैरप्रकार झाल्याची दाट शक्यता असून, राज्यात पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकांनी उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थ्यांचे एकसारखे सहा प्रश्न चुकले आहेत. या परीक्षार्थ्यांना निकालात २०० पैकी १९४ गुण असून, राज्यसेवा मुख्य परीक्षेसारख्या परीक्षा देणाऱ्यांना १६० गुणही मिळवता आलेले नाही. या निकालात उत्तम गुण मिळवणारे संशयाच्या भोवऱ्यात असून, त्यांनी ‘हायटेक कॉपी’ किंवा ‘रीलॉगइन’ करून परीक्षा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या सर्व प्रकारामुळे परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या महापरीक्षा पोर्टलचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे निकाल आणि भरती प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी एमपीएसससी समन्वय समितीमार्फत करण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, नाशिक, लातूर, कोकण विभागीय मंडळामध्ये एकूण २६६ कनिष्ठ लिपिक पदासाठीची परीक्षा गेल्या महिन्यात पार पडली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्या निकालात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची शक्यता आहे. ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलने ऑनलाइन पद्धतीने सकाळ आणि दुपारच्या सत्रात घेतली. अनेक तांत्रिक कारणांमुळे या परीक्षेत गोंधळ निर्माण झाला होता. काही परीक्षा केंद्रांवरील परीक्षा रद्द करावी लागली होती.

या परीक्षेत २०० प्रश्न होते; तसेच प्रत्येक प्रश्नाला एक गुण होता. या निकालात पहिल्या सहा क्रमाकांवरील परीक्षार्थ्यांना १९४ गुण असून, त्यापैकी पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकांनी उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थ्यांचे एकसारखे सहा प्रश्न चुकले आहेत. या तिन्ही परीक्षार्थ्यांनी ५ डिसेंबरला सकाळी १० ते १२ या वेळेत परीक्षा दिली असून, पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारे परीक्षार्थी एकाच परीक्षा केंद्रावरील आहेत. तर, चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थ्याचे परीक्षा केंद्रदेखील त्याच परिसरातील आहे. पहिल्या ५० क्रमांकांपर्यंत अशा प्रकारचा घोळ काही परीक्षार्थ्यांच्या बाबतीत झाला आहे. याशिवाय १७ आणि २१ क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्यांना एकसारखे १८७ गुण असून, त्यांचे प्रश्नदेखील सारखेच चुकले आहेत. त्याचप्रमाणे दोघांचेही परीक्षा केंद्र आणि वेळ एकसारखी आहे. परीक्षार्थ्यांच्या रिस्पॉन्स शीटद्वारे ही माहिती समोर आली आहे. या परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर छोटा बटन कॅमेरा, ब्लू-टूथ मायक्रोफोन कानात लावून ‘हायटेक कॉपी’ केल्याची दाट शक्यता आहे. काही परीक्षार्थ्यांनी परीक्षेची वेळ संपल्यानंतर पुन्हा ‘रीलॉगइन’ करून परीक्षा दिल्याचा आरोप अनेक परीक्षार्थ्यांकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे राज्य मंडळाच्या पदभरतीत प्रामाणिक आणि गुणवंत उमेदवारांवर अन्याय झाला असून, सरकारी नोकरीपासून ते दूर असल्याचे चित्र आहे. या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन महाआयटी विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी अजित पाटील यांनी दिले आहेत.

मी राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली असून, या परीक्षेत १३४ गुण मिळाले. या परीक्षेमध्ये १९४ गुण मिळालेले सहा परीक्षार्थी आहेत. त्यानंतर थेट १८७ गुण मिळवणारे परीथार्थी आहेत. ‘एमपीएससी’द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या निकालात राज्यात पहिला येणार विद्यार्थी आणि कटऑफ गुणांमध्ये साधारण ६ गुणांचे अंतर असते. मात्र, इथे कट ऑफ गुणांवर निवड झालेला आणि प्रथम आलेल्या परीक्षार्थ्यामध्ये गुणांचे खूप अंतर आहे. या संपूर्ण निकालात घोळ आणि गैरप्रकार झाला आहे.

सौर्स: मटा
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *