Temporary recruitment of doctors in Mumbai Mahanagarpalika

Temporary recruitment of doctors in Mumbai Mahanagarpalika

मुंबई महापालिकेत डॉक्टरांची तात्पुरती भरती

MCGM Doctor Recruitment 2020 : Mumbai Municipal Corporation means BMC has started taking urgent steps to increase the strength of the medical field to prevent the spread of corona. In this regard, the administration has ordered the appointment of temporary specialists, doctors, nurses, laboratory technicians, pharmacists, X-ray technicians, wardboys and workers. Other important details like educational qualification, age limit, salary details etc., given briefly. Read the details carefully and keep visit us. 

मुंबई महापालिकेत करारावर नर्सची भरती होणार

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ६६४ जागेंसाठी भरती

मुंबईत दिवसेंदिवस करोनाचा फैलाव वाढत असून रोज नवे रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. या रुग्णांसाठी रुग्णालयांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी उपचारांची सोय व्हावी म्हणून काही सार्वजनिक ठिकाणेही ताब्यात घेण्यात आली आहेत. या ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तर, काही ठिकाणी संशयितांच्या चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे. नवनव्या जागांचा शोध सुरू असला तरी वाढत्या मनुष्यबळाअभावी सध्या अस्तित्वात असलेल्या कर्मचाऱ्यांवरचा कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी १२ ते १६ तास काम करत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैदयकीय क्षेत्रातील मुनष्यबळ वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेने तातडीने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यादृष्टीने अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ, डॉक्टर, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एक्सरे तंत्रज्ञ, वॉर्डबॉय तसेच कामगारांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.

हा ताण कमी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरील विविध पदांवर तात्पुरत्या नेमणुका करण्याचे अधिकार आयुक्तांनी संबंधित अधिष्ठाता, उपायुक्त, कार्यकारी आरोग्य अधिकारी, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक तसेच सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्राची गरज लक्षात घेऊन आणि अर्जदाराकडे आवश्यक ती शैक्षणिक पात्रता व अनुभव असल्याची खात्री झाल्यानंतर नेमणुका करावयाच्या आहेत.

अतिदक्षता विषयक तज्ज्ञांना दरमहा रुपये दीड ते दोन लाख, एम.बी.बी.एस. डॉक्टर असल्यास दरमहा रुपये ८० हजार, बी.ए.एम.एस. असल्यास दरमहा रुपये ६० हजार आणि बी.एच.एम.एस. डॉक्टरांना दरमहा रुपये ५० हजार एवढे मानधन दिले जाणार आहे. परिचारिकांना, प्रयोगशाळा तंत्रज्ञांना व इतर तंत्रज्ञांना दरमहा ३० हजार रुपये; तर वॉर्डबॉय, कामगार यांना दरमहा २० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हा खर्च करोनासाठीच्या तरतुदीतून केला जाणार आहे. अर्जदारांना १७ एप्रिलपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज करता येईल. कक्ष परिचर या पदासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम २००५ मधील प्रतिज्ञापत्र भरून द्यायचे आहे.

सौर्स : मटा

Recruitment of 228 doctors at Mumbai Municipal Hospitals

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत २२८ डॉक्टरांची भरती

Mumbai Mahanagarpalika Hospital Bharti 2020 : BMC published a news for the recruitment of 228 doctor posts.  Due to the shortage of doctors, the hospitals of Mumbai Municipal Corporation are always complaining about the stress. To remedy this, the municipality will recruit 228 doctors in 16 hospitals in the suburbs. This will provide some comfort to suburban patients. The recruitment was for six months, after which the doctors could be hired, said Municipal officials. Read the complete details carefully which is given below, also keep visit on our website for further updates.

पुणे महापालिकेत डॉक्टरांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळाNew Update

उपनगरांतील रुग्णालयांत २२८ डॉक्टरांची भरती

डॉक्टरांची संख्या कमी असल्याने मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर ताण येत असल्याची तक्रार नेहमीच केली जाते. त्यावर उपाय म्हणून पालिका उपनगरांतील १६ रुग्णालयांमध्ये २२८ डॉक्टरांची भरती करणार आहे. त्यामुळे उपनगरातील रुग्णांना काहीसा दिलासा मिळेल. ही भरती सहा महिन्यांसाठी असून, त्यानंतर या पदावर डॉक्टरांना कायम केले जाण्याची शक्यता असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पालिकेच्या केईएम, सायन, नायर या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरांतील १६ रुग्णालयांमध्ये दररोज हजारोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणात ताण असतानाही रुग्णालयांमधील अनेक रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत व पालिका सभागृहात शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी रिक्त पदे भरण्याची मागणी वारंवार लावून धरली आहे. त्याची दखल घेत पालिकेने उपनगरांतील रुग्णालयांत ही भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

इच्छुक उमेदवारांनी १७ ते ३१ जानेवारी या कालावधीत आपले अर्ज वांद्रे येथील भाभा रुग्णालयाच्या इमारतीत सातव्या मजल्यावरील कक्षात दाखल करावयाचे आहेत. खुल्या वर्गासाठी वयोमर्यादा ३८ वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. तसेच, मागास आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ४३पेक्षा जास्त वय असू नये, असे नमूद करण्यात आले आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४५पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना १५,६०० अधिक ३९,१०० अधिक ग्रेड पे ६ हजार रुपये अधिक भत्ते देण्यात येणार आहेत.

विभाग व पदे Department and no. of vacancies details

-स्त्रीरोग व प्रसूतिगृह शास्त्र: २०

-बालरोग चिकित्सा: २९

-अस्थिव्यंग: १५

-वैद्यक शास्त्र: ४९

-शल्यक्रिया शास्त्र: २६

-बधिरीकरण: ८९

-एकूण: २२८

म. टा.

📄 जाहिरात
2 thoughts on “Temporary recruitment of doctors in Mumbai Mahanagarpalika”

Leave a Comment