TET Exam 2020 Online Now

TET Exam 2020 Online Now

टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर, १६ हजार ५९२ उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र-Maha TET 2019

टीईटी होणार ऑनलाईन

There are a lot of vacancies for teachers in the state of Karnataka. The education department had decided to conduct the TET exam in March as it was causing academic loss to the students. It was also appealed to apply online after the decision was taken to take the TET exam. In response, thousands of DEAD and BEAD holders in the state have filed applications. But due to the lockdown, the exam could not be held in March. But the education minister has suggested preparing for the TET. The education department has started preparations to conduct TET online so that there is no further delay in teacher recruitment. It has also been informed that the date of TET will be announced after the release of the schedule of the 10th examination. This will bring relief to the students who are waiting for the TET.

TET Exam Online Now

शिक्षक भरतीसाठी अधिक प्रमाणात विलंब होऊ नये यासाठी शिक्षण खात्याने टीईटी ऑनलाईन घेण्याची तयारी सुरु केला आहे. तसेच दहावी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर टीईटीची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे टीईटीच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
कर्नाटक राज्यात शिक्षकांच्या जागा मोठ्‌या प्रमाणात रिक्‍त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षण खात्याने मार्च महिन्यात टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत राज्यातील हजारो डिएड व बिएडधारकांनी अर्ज दाखल केले आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यात परीक्षा होऊ शकली नाही. परंतु शिक्षण मंत्र्यानी टीईटीची तयारी करण्याची सुचना केली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा वेळेत घेण्यास अडचण निर्माण होणार असल्याने ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत विचार सुरु करण्यात आला असुन ऑनलाईन परीक्षेबाबत अनेक अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. 2014 मध्ये राज्यात सर्व प्रथम टीईटी घेण्यात आली होती तेंव्हापासुन दरवर्षी टीईटी घेतली जात आहे. मात्र टीईटीचा निकाल अतिशय कमी लागत असल्याने अधिक प्रमाणात शिक्षकांची भरती करण्यास अडचण येत आहे अशी माहिती शिक्षण खात्याकडुन देण्यात येत आहे. सध्या राज्यातील विविध सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये 14 हजारांहुन अधिक, शिक्षकांच्या जागा रिक्‍त आहेत. यापैकी 9500 शिक्षकांच्या जागा भरती करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र टिईटी वेळेत होत नसल्याने शिक्षक भरतीस विलंब होत आहे. यावेळी कोरोनाच्या संकटामुळे टीईटीवरही संकट निर्माण झाले आहे. मात्र ऑनलाईन परीक्षा घेतल्यास टीईटीधारकांना दिलासा मिळणार आहे.
दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर टीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली असुन ऑनलाईन परीक्षा घेतल्यास परीक्षार्थींना लाभ मिळणार आहे. त्यामुळे परीक्षार्थींनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे
ए. बी. पुंडलीक , जिल्हा शिक्षणाधिकारी

सौर्स : सकाळ
Leave a Comment