The second phase of Teacher Recruitment begins

The second phase of Teacher Recruitment begins

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू

Teachers Recruitment 2020 : Shikshak Bharti 2020 process is now on second phase. The hiring process of Teachers Bharti 2020 is likely to begin in the new year. Apart from interviews in Urdu medium schools, the process of document verification for candidates on the recruitment selection list started on Wednesday. The unauthorized process for other media will be announced by January 15th, 2020.

Shikshak Bharti 2020

शिक्षक भरतीची रखडलेली प्रक्रिया नवीन वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. उर्दू माध्यमाच्या शाळांमधील मुलाखतीशिवाय पदभरती निवड यादीतील उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया बुधवारपासून सुरुवात झाली. इतर माध्यमांसाठीची विनामुलाखतीशिवायची प्रक्रिया १५ जानेवारीपर्यंत जाहीर केली जाणार आहे.

शिक्षक भरतीची प्रक्रिया २८ ऑगस्ट २०१९ पासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात ५८२२ उमदेवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत चालली. त्यापैकी अनेकांनी नियुक्ती स्वीकारली. मात्र, दुसरा टप्पा सुरू झालेला नाही. नवीन वर्षात भरतीचा पुढचा टप्पा मार्गी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थामध्ये निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १० जानेवारपर्यंत ही प्रक्रिया उमदेवारांना पूर्ण करायची आहे. १७५ शिक्षकांची निवड यादी २७ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. नियुक्ती देण्यापूर्वी संबंधित उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. ऑगस्टमध्ये उर्दू माध्यमाची आरक्षणानुसार पात्र उमेदवार न झाल्याने काही जागा रिक्त होत्या. त्या रिक्त जागांवर माजी सैनिक, सामाजिक आक्षणनिहाय शिल्लक रिक्त पदे खुल्या पद्धतीने भरण्यात येत आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून नव्याने प्राधान्यक्रम भरल्यानंतर गुणवत्तेनुसार ही यादी जाहीर केली होती. यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांमधील रिक्त जागांचा समावेश आहे. इतर माध्यमांमधील विनामुलाखत पदभरतीचा टप्पा अद्याप सुरू झालेला नाही. यामध्ये प्राधान्यक्रम दिल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता पवित्र पोर्टलने केली असून ही प्रक्रिया १५ जानेवारी दरम्यान सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये ७७१ जागांसाठीची प्रक्रिया असणार आहे. ५८२२ निवड यादीनंतरची ही मोठी यादी असणार आहे. भरती प्रक्रियेत १२ हजार शिक्षकांची भरती केली जाईल, असे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात प्रक्रिया रखडल्याने एकच टप्पा सुरू आहे. दुसरा टप्पा मार्गी लागल्या राज्यभरात आणखी साडेसहा हजारपेक्षा अधिक डीटीएड, बीएडधारकांना नोकरीची संधी मिळाण्याची शक्यता आहे.

समांतर, आक्षेप अर्जांचा संभ्रम कायम

समांतर आरक्षणासह आक्षेप घेतलेल्या उमेदवारांचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. पवित्र प्रणालीतून निवड यादी जाहीर झाली. त्यानंतर राज्यभरातून अनेक आक्षेप आले. अधिकचे गुण असताना निवड यादीत नाव नसणे, प्राधान्यक्रम चुकीचा देणे, पदांबाबत आक्षेप आहेत. त्यांची छाननी करून याबाबतच्या सर्व उमेदवारांच्या प्रकरणांचा निपटारा करावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया केव्हा होते याकडेही उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

म. टा.
1 thought on “The second phase of Teacher Recruitment begins”

Leave a Comment