Traffic Police Bharti 2019

Traffic Police Bharti 2019

राज्य पोलीस दलात आता २१४४ पदांची भरती

Traffic Police Recruitment News : Various posts will be still vacant in Traffic Police Department. As per the latest news source total 2144 various posts will be filled in the Traffic Police Department in this year. The problem of inadequate manpower of the traffic police to regulate traffic is going to be solved. The Home Department has approved the creation of 2,144 posts of officers and staff in transport branches across the state. It has approved 74 posts of officers and staff for the transportation branches of the city district. Due to this, the staff will be provided with the existing manpower for the transport branches.

राज्यात डिसेंबरपासून ७२ हजार रिक्‍त जागेची महाभरती

SRPF Police Bharti 2019

Police Bharti 2020 for 8757 Posts

Police Bharti 2019

Police Bharti Exam 2019 Delay

Maharashtra Police Recruitment 2019

Police Bharti Important Details

वाहतूक पोलिस भरती २०१९

राज्यातील वाढते अपघात आणि वाहतुक कोंडीच्या प्रतिबंधासाठी राज्य पोलीस दलात आता आणखी 2144 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये 3 उपायुक्त, 6 उपअधीक्षकांसह 27 पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयातर्गंत सर्वाधिक 620 पदे भरण्यात येणार आहेत. गृह विभागाने नुकत्याच घटकनिहाय पदाच्या वाटपाला हिरवा कंदील दाखविला आहे.
उच्च न्यायालयाने सुचविलेल्या उपाययोजनेनुसार सुरळीत वाहतूक नियंत्रणासाठी पहिल्या टप्प्यात इतकी पदे भरण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी जागांची निर्मिती केली जाईल, असे गृह विभागातील वरिष्ठांकडून सांगण्यात आले. 2013 मध्ये उच्च न्यायालयात वाहतूक कोंडीच्या समस्येवर ठोस कारवाई करण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ती निकालात काढताना न्यायालयाने राज्य सरकारला विविध उपाययोजना सुचवल्या होत्या.
उच्च न्यायालयाने वाहतुक शाखेसाठी स्वतंत्र पदाची निर्मीती करण्याची सुचना दिली होती. त्यांच्याकडून रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी, अनधिकृतपणे सोडून दिलेली, बेवारस वाहने हटवणे या जबाबदाऱ्या प्रामुख्याने सोपविण्यात येणार आहे. न्यायालयाने सुचविलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील विविध वाहतुक शाखांकरिता एकूण विविध दर्जाची 2144 पदे नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव यावर्षी 23 जानेवारीला गृह विभागाला सादर केला होता.

नव्याने निर्माण करण्यात येणारी सवर्गनिहाय पदे

 • पद संख्या
 • अधीक्षक -1
 • उपअधीक्षक -6
 • निरीक्षक – 27
 • सहायक निरीक्षक – 63
 • उपनिरीक्षक – 108
 • सहायक फौजदार – 126
 • हवालदार – 379
 • शिपाई – 1143
 • चालक शिपाई – 289
सौर्स : पोलीसनामा

वाहतूक शाखांना मिळणार बळकटी

वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या दूर होणार आहे. राज्यभरातील वाहतूक शाखांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची २ हजार १४४ पदे निर्माण करण्यास गृहविभागाने मंजुरी दिली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील वाहतूक शाखांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ७४ पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे वाहतूक शाखांना सध्याच्या मनुष्यबळातून कर्मचारी पुरविले जाणार आहेत.

रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारी, अनधिकृपणे रस्त्य़ावर सोडून दिलेली, बेवारस वाहने हटविण्यासाठी, वाढत्या वाहतुकीस समस्यांवर उपायोजना करण्यासाठी काही वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर न्यायालयाने गृहविभागाने काही आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील पोलिस दलातील वाहतूक शाखांसाठी पहिल्या टप्प्यासाठी तीन पोलिस अधीक्षक, सहा पोलिस उपअधीक्षक, २७ पोलिस निरीक्षक, ६२ सहायक निरीक्षक, १०८ उपनिरीक्षक, १२६ सहायक उपनिरीक्षक, ३७९ हवालदार, १ हजार १४३ पोलिस शिपाई, २८९ पोलिस शिपाई अशी २ हजार १४४ पदे निर्माण करण्यास गृहविभागाने मान्यता दिली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यात नगर जिल्ह्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ७४ पदांना मान्यता देण्यात आली आहे. नगरसाठी एक पोलिस निरीक्षक, एक सहाय़क निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, सहा सहायक निरीक्षक, १४ हवालदार, ४० पोलिस शिपाई, दहा वाहनचालक अशा ७४ पदांना मान्यता दिलेली आहे. ही पदे सध्याच्या उपलब्ध पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून भरली जाणार आहेत. जिल्ह्यामध्ये नगर शहरात शहर वाहतूक शाखा, शिर्डीला शहर वाहतूक शाखा आहे. तर संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव येथे जिल्हा वाहतूक शाखा आहे. नगरमध्ये शहर वाहतुकीला एक पोलिस निरीक्षक व ६४ कर्मचारी आहेत. शिर्डी पोलिस स्टेशनला एक अधिकारी व ५४ पोलिस कर्मचारी आहेत. परंतु, संगमनेर, श्रीरामपूर, शेवगावला मात्र वाहतूक पोलिसांची संख्या कमी आहे. शेवगावला अवघे सहा वाहतूक पोलिस आहेत. संगमनेर व श्रीरामपूरला प्रत्येकी पंधरा पोलिस कर्मचारी आहेत. शिर्डी व शनिशिंगणापूर येथे लाखो भाविकांची गर्दळ असते. त्यमुळे दोन्ही ठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलिस जास्त असतात. त्यामुळे जास्तीचे वाहतूक पोलिस मिळणार असल्याने सध्या वाहतूक पोलिसांवर ताण ही कमी होण्यास मदत होणार आहे. सध्याच्या उपलब्ध मनुष्यबळातून हे कर्मचारी देण्यात येणार आहेत. त्यामुळे हे कर्मचारी वाहतूक शाखांना लवकर मिळणार आहेत.

पोलिस भरतीची शक्यता Police Bharti 2020 will be soon

पोलिस दलातील पोलिस कर्मचारी, अधिकारी यांची वाहतूक शाखेत नियुक्ती होते. वाहतूक शाखांसाठी नवीन पदांना मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पोलिस दलामध्ये जास्त पदे निर्माण झाली आहेत. त्यामुळे पोलिस भरती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरमधील नवीन बारा पोलिस स्टेशनचे प्रस्ताव गृहविभागाला गेल्या महिन्यांत पाठविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव मंजूर झाल्यास जास्त पोलिस स्टेशन व मनुष्यबळ नगरला उपलब्ध होणार आहे.

सध्याची वाहतूक शाखेतील पदे

 • नगर शहर – ६४
 • शिर्डी – ५४
 • संगमनेर – १५
 • श्रीरामपूर – १५
 • शेवगाव – ८
सौर्स : मटा
5 thoughts on “Traffic Police Bharti 2019”

Leave a Comment