UGC NET Exam 2021

UGC NET 2021

UGCनं दिली गुड न्यूज! नेटची परीक्षा देणाऱ्यांना दिलासा

UGC NET Exam Latest news : The process of filling up the application for the UGC NET exam to be held in May this year has started. Importantly, the age limit for candidates appearing for the JRF exam has been increased. According to the National Testing Agency (NTA), the discount will be valid for this year only. The UGC has clarified that the age limit for next year’s NET exams will be 30 years. The process of applying for UGC NET exam has started from February 2 and aspiring candidates can apply till March 2. The deadline for paying the examination fee is March 3. Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank had announced the dates for the UGC NET exams. The UGC-NET exam in December 2020 could not be taken for some reason. The exam will now be held on May 2, 7, 10, 12, 14 and 17. 

  1. यंदा मे महिन्यात होणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेआरएफची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने दिलेल्या माहितीनुसार, ही सूट फक्त या वर्षासाठी लागू असणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या नेट परीक्षांसाठी ३० वर्षे वयोमर्यादा राहील, असं यूजीसीनं स्पष्ट केलं आहे.  दरम्यान, २ फेब्रुवारीपासून यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून २ मार्चपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. तर ३ मार्चपर्यंत परीक्षा फी भरण्यासाठी मुदत असणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यूजीसी नेट परीक्षांसBEठीच्या तारखांची घोषणा केली होती. डिसेंबर २०२० मध्ये होणारी यूजीसी-नेट परीक्षा काही कारणास्तव घेता आली नाही. आता ही परीक्षा २, ७, १०, १२, १४ आणि १७ मे या दिवशी घेण्यात येणार आहे.
  2. प्रवर्गानुसार सवलत मिळणार – यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ट्रान्सजेंडर प्रवर्गातील उमेदवार आणि महिलांना ५ वर्षांपर्यंत सवलत मिळेल. एलएलएम पदवीधरांना ३ वर्षाची सवलत मिळेल. सहायक प्राध्यापक पात्रतेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.
  3. परीक्षेचा पॅटर्न  – यूजीसी-नेट/जेआरएफ या परीक्षेसाठी दोन प्रश्नपत्रिका (पेपर) असतील. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात हे पेपर होतील. पहिला पेपरमध्ये जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, टीचिंग आणि जनरल रिसर्च अॅप्टिट्यूट यावर आधारीत प्रश्न विचारण्यात येतील. दुसरा पेपर संबंधित विषयाचा असेल.
  4. उमेदवार ८४ विषयांमध्ये नेटची परीक्षा देऊ शकतात.  – सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ या वेळेत पेपर होतील. दोन्ही पेपरसाठी ३ तास वेळ असेल. पेपर सुरू होण्यापूर्वी १ तास अगोदर उमेदवारांना परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. परीक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.

CSIR-UGC NET June 2020 Exam Answer Key Released

UGC NET Exam Result 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने गुरूवारी सीएसआयआर-यूजीसी नेट जून २०२० च्या परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका अधिकृत वेबसाइट csirnet.nta.nic.in वर  जाहीर केली. उमेदवारांना 5 डिसेंबरपर्यंत हरकत घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

Nta.ac.in वरील अधिकृत अधिसूचनेनुसार प्रश्नपत्रिका, प्रत्येक उमेदवाराचे चिन्हांकित प्रतिसाद आणि  विषयांसाठी तात्पुरती उत्तरतालिका वेबसाइटवर उपलब्ध आहेत. सीएसआयआर नेट 19, 21, 26 आणि 30 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती .

5 डिसेंबर पर्यंत उत्तरतालिकेवर आक्षेप देऊ शकतात

एनटीएने सीएसआयआर-यूजीसी नेट जून 2020 ‘उत्तरतालिका ’ या संदर्भातही उमेदवारांकडून आक्षेप मागवले आहेत. उमेदवार परीक्षा पोर्टलवर प्रदान केलेल्या प्रक्रियेतील विविध प्रश्नांची उत्तरे आव्हान देऊ शकतात. तथापि, एजन्सीने प्रति उत्तर 1000 रुपये शुल्क निश्चित केले आहे.

Download CSIR NET Answer Key


UGC NET Result Out

UGC NET Results : विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC NET 2020) जून २०२० परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोविड – १९ मुळे ही परीक्षा स्थगित होऊन सप्टेंबर-नोव्हेंबर २०२० मध्ये आयोजित करण्यात आली होती. आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ने अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केला आहे.

निकाल पुढीलपैकी कोणत्याही एका संकेतस्थळावर पाहता येईल 

एकूण ५ लाख २६ हजार ७०७ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. ८१ विविध विषयांसाठी परीक्षा झाली. सर्व उमेदवारी आपला निकाल संकेतस्थळावर पाहू शकतात. निकालाची थेट लिंकही या वृत्ताच्या अखेरीस देण्यात आली आहे.

कसा पाहाल निकाल?

-निकाल पाहण्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या यूजीसी नेट रिझल्ट डायरेक्ट लिंक (UGC NET Result Direct Link) वर क्लिक करा.

-नवं पेज उघडेल.

-तेथे आपला अॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमीट करा.

-तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तो डाऊनलोड करा.

-थेट लिंकद्वारे UGC NET Result 2020 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


UGC NET 2020 final answer key

UGC NET 2020 Answer Key: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) यूजीसी नेट (UGC NET) परीक्षेची अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) जारी केली आहे. एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर nta.ac.in वर ही आन्सर की जारी करण्यात आली आहे.

यूजीसी नेट ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा २४ सप्टेंबर २०२० ते १३ नोव्हेंबर २०२० दरम्यान घेण्यात आली होती. देशभरातून एकूण ८ लाख ६० हजार ९७६ उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ ५ लाख २६ हजार ७०७ उमेदवारच परीक्षेला बसले. विविध ८१ विषयांमध्ये ही संगणकीकृत परीक्षा झाली होती. एनटीएनेही यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की प्रोव्हिजनल आन्सर की वर नोंदवलेल्या सर्व हरकतींचे परीक्षण करून त्यांचे निराकरण करून ही अंतिम उत्तर-तालिका तयार केली गेली आहे. याच्या आधारे निकाल तयार करण्यात आला आहे

-थेट लिंकद्वारे यूजीसी नेट २०२० अंतिम उत्तरतालिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा …

-यूजीसी नेट २०२० चा निकाल एनटीएकडून लवकरच जाहीर केला जाईल. हा निकाल एनटीए आणि यूजीसी नेटची अधिकृच वेबसाइट nta.ac.in आणि ugcnet.nta.nic.in वर जाहीर केला जाईल.

-यूजीसी नेटच्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा …


यूजीसी नेट परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की २०२० एनटीएने जारी 

UGC NET Exam Result 2020: यूजीसी नेट २०२० उत्तरतालिका  ugcnet.nta.nic.in वर जाहीर करण्यात आली आहे आणि ४ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या परीक्षांसाठी उत्तरतालिका ऑनलाईन उपलब्ध आहेत. दिलेल्या लिंकवर तुम्ही बघू शकतात .

नॅशनल टेस्टिंग एजन्सी, एनटीए ने  4 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या उर्वरित 26 विषयांच्या यूजीसी नेट जून 2020 उत्तरतालिका जाहीर केल्या आहेत. या परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांचे प्रश्न व तात्पुरती उत्तरतालिका  ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकतात .

4 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत यूजीसी नेट जून 2020 च्या परीक्षेस बसलेले उमेदवार ugcnet.nic.in वर दिलेल्या लिंकवर लॉग इन करू शकतात आणि प्रतिसाद , उत्तरतालिका तपासू शकतात. तात्पुरते उत्तरतालिका वरील आक्षेप ऑनलाईन देखील भरता येऊ शकतात.

UGC NET 2020 Answer Key

उमेदवार कृपया नोंद घ्या , आक्षेप घेण्याची सुविधा उद्या बंद होईल. तसेच फी भरल्याशिवाय प्राप्त झालेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांना दिलेल्या उत्तरातून त्यांच्या उत्तरतालिका आणि प्रश्नपत्रिका तपासून डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

एनटीए यूजीसी नेट 2020 ची अस्थायी उत्तरतालिकेस आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत आहे. यापूर्वी एनटीएने 24 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घेण्यात आलेल्या परीक्षांसाठी यूजीसी नेट 2020 उत्तरतालिका जाहीर केली होती.


UGC NET Exam Result 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी नेट परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की २०२० जारी केली आहे. यूजीसी नेट परीक्षेच्या संकेतस्थळावर ही उत्तरतालिका गुरुवारी जारी करण्यात आली. ज्या उमेदवारांनी एनटीए यूजीसी नेट २०२० परीक्षा दिली आहे त्यांनी अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta.nic.in वर जाऊन उत्तरतालिका पाहावी.

UGC NET Answer Key 2020 सोबतच एनटीएने या उत्तरतालिकेवरील हरकती नोंदवण्याची लिंकही सक्रीय केली आहे. ही लिंक ७ नोव्हेंबर २०२० पर्यंत अॅक्टिव्ह असणार आहे. या वृत्ताच्या अखेरीस ही लिंक तसेच उत्तरतालिकेची लिंकही देण्यात येत आहे. २४ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२० या कालावधीत NET च्या ५५ विषयांच्या परीक्षा झाल्या. या सर्व प्रश्नपत्रिकांच्या तात्पुरत्या उत्तरतालिका जाहीर करण्यात आल्या आहेत.

NTA UGC NET 2020 Answer Key : कशी डाऊनलोड करायची?

पुढील पद्धतीने UGC NET 2020 Answer Key डाऊनलोड करता येईल –

  •  यूजीसी नेटचे अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta.nic.in वर जावे
  •  होमपेजवर ‘View Question Paper/ Answer Key Challenge’ या पर्यायावर क्लिक करावे.
  •  तुमचा UGC-NET अॅप्लिकेशन नं., जन्मतारीख, सिक्युरिटी पिन टाकावी.
  • लॉगइन केल्यावर view / download या पर्यायवर क्लिक करत हव्या त्या ऑपशनवर जावे. येथे उत्तरतालिका, प्रश्नपत्रिका आणि उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका असे अनेक पर्याय असतील.
  • उत्तरतालिकेबाबत काही हरकत असेल तर तीही नोंदवावी. त्यासाठीची लिंकही देण्यात आलेली आहे.

NTA UGC NET 2020  प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment