UGC NET Exam Result 2020

UGC NET Exam Result 2020

UGC NET Exam Result 2020: यूजीसी नेट २०२० उत्तरतालिका  ugcnet.nta.nic.in वर जाहीर करण्यात आली आहे आणि ४ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या परीक्षांसाठी उत्तरतालिका ऑनलाईन उपलब्ध आहेत. दिलेल्या लिंकवर तुम्ही बघू शकतात .

नॅशनल टेस्टिंग एजन्सी, एनटीए ने  4 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या उर्वरित 26 विषयांच्या यूजीसी नेट जून 2020 उत्तरतालिका जाहीर केल्या आहेत. या परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांचे प्रश्न व तात्पुरती उत्तरतालिका  ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकतात .

4 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत यूजीसी नेट जून 2020 च्या परीक्षेस बसलेले उमेदवार ugcnet.nic.in वर दिलेल्या लिंकवर लॉग इन करू शकतात आणि प्रतिसाद , उत्तरतालिका तपासू शकतात. तात्पुरते उत्तरतालिका वरील आक्षेप ऑनलाईन देखील भरता येऊ शकतात.

UGC NET 2020 Answer Key

उमेदवार कृपया नोंद घ्या , आक्षेप घेण्याची सुविधा उद्या बंद होईल. तसेच फी भरल्याशिवाय प्राप्त झालेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांना दिलेल्या उत्तरातून त्यांच्या उत्तरतालिका आणि प्रश्नपत्रिका तपासून डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

एनटीए यूजीसी नेट 2020 ची अस्थायी उत्तरतालिकेस आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत आहे. यापूर्वी एनटीएने 24 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घेण्यात आलेल्या परीक्षांसाठी यूजीसी नेट 2020 उत्तरतालिका जाहीर केली होती.


UGC NET Exam Result 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी नेट परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की २०२० जारी केली आहे. यूजीसी नेट परीक्षेच्या संकेतस्थळावर ही उत्तरतालिका गुरुवारी जारी करण्यात आली. ज्या उमेदवारांनी एनटीए यूजीसी नेट २०२० परीक्षा दिली आहे त्यांनी अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta.nic.in वर जाऊन उत्तरतालिका पाहावी.

UGC NET Answer Key 2020 सोबतच एनटीएने या उत्तरतालिकेवरील हरकती नोंदवण्याची लिंकही सक्रीय केली आहे. ही लिंक ७ नोव्हेंबर २०२० पर्यंत अॅक्टिव्ह असणार आहे. या वृत्ताच्या अखेरीस ही लिंक तसेच उत्तरतालिकेची लिंकही देण्यात येत आहे. २४ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२० या कालावधीत NET च्या ५५ विषयांच्या परीक्षा झाल्या. या सर्व प्रश्नपत्रिकांच्या तात्पुरत्या उत्तरतालिका जाहीर करण्यात आल्या आहेत.

NTA UGC NET 2020 Answer Key : कशी डाऊनलोड करायची?

पुढील पद्धतीने UGC NET 2020 Answer Key डाऊनलोड करता येईल –

  •  यूजीसी नेटचे अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta.nic.in वर जावे
  •  होमपेजवर ‘View Question Paper/ Answer Key Challenge’ या पर्यायावर क्लिक करावे.
  •  तुमचा UGC-NET अॅप्लिकेशन नं., जन्मतारीख, सिक्युरिटी पिन टाकावी.
  • लॉगइन केल्यावर view / download या पर्यायवर क्लिक करत हव्या त्या ऑपशनवर जावे. येथे उत्तरतालिका, प्रश्नपत्रिका आणि उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका असे अनेक पर्याय असतील.
  • उत्तरतालिकेबाबत काही हरकत असेल तर तीही नोंदवावी. त्यासाठीची लिंकही देण्यात आलेली आहे.

NTA UGC NET 2020  प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment