Ulhasnagar Mahanagarpalika Pharmcy Candidates Bharti

Ulhasnagar Mahanagarpalika Pharmcy Candidates Bharti

उल्हासनगर महानगरपालिका मध्ये फार्मसी पदवी, अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

Ulhasnagar Municipal Corporation Recruitment 2020 – under the nuhm various posts is vacant in Ulhasnagar Mahanagarpalika. Walk in interview will be held on below given link. Read the complete details given below on this page and keep visit us for the further updates.

Ulhasnagar Municipal Corporation Recruitment 2020

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर, वैद्यकीय आरोग्य विभाग, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यक्रम (NUHM) अंतर्गत कंत्राटी तत्वावर रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत. रिक्त पदांचा तपशील.

१) औषध निर्माता (Pharmacist) – ४ पदे, (अज – १, इमाव – १, एसईबीसी – १, खुला – १).

थेट मुलाखतीचा दिनांक – १२ फेब्रुवारी २०२०,

पात्रता :- फार्मसीमधील पदविका किंवा पदवी, अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

मानधन दरमहा रु. १०,०००/-

२) ऑक्झिलरी नर्स मिडवाइफ (A.N.M.) – एकूण ३२ पदे. (अजा – २, विजा (अ) – १, भज (ब) – १, भज (ड) – १, विमाप्र – १, इमाव – ६, एस.ई.बी.सी. – ६, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १०)

थेट मुलाखतीचा दिनांक – १३ फेब्रुवारी, २०२०.

पात्रता – दहावी उत्तीर्ण, ए.एन.एम. कोर्स (अनुभव आणि एम.एन.सी.कडे नोंदणी असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल.) मानधन दरमहा रु. ८,६४०/-(उच्च पात्रताधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.)

दोन्ही पदांसाठी थेट मुलाखतीच्या दिवशी अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ९.३० ते ११.३०वा.

अर्ज छाननीची वेळ – सकाळी १२.०० ते १.३०

मुलाखतीची वेळ – दुपारी २.३० वाजेपासून पुढे.

वयोमर्यादा – अमागास – ३८ वर्षांपर्यंत, मागासवर्गीय – ४३ वर्षांपर्यंत,

उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती दि. ३१ मार्च, २०२० पर्यंत राहील.

निवड पद्धती – दोन्ही पदांसाठी पात्रता परीक्षेच्या शेवटच्या वर्षांच्या गुणांना ८०% Weightage दिले जाईल, ५ गुण अतिरिक्त शिक्षणासाठी, ५ गुण अनुभवासाठी, आणि १० गुण मुलाखतीसाठी राहतील. एकूण १०० गुण. निवड यादीतील गुणानुक्रमांकाचे आधारे प्राधान्यक्रमाने पदस्थापना दिली जाईल.

शुल्क – रु. १५०/- खुला प्रवर्ग व रु. १००/- राखीव वर्ग.

या रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट “Deputy Director Health Services, Thane” यांच्या नावे काढलेला असावा.

सदर भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वर्षभरात भविष्यात जर एखाद्या ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाल्यास प्रतीक्षा यादीवरील उमेदवारास नवीन भरती प्रक्रिया न करता नियुक्ती आदेश दिले जातील.

अर्जासोबत जोडावयाच्या मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती-

१) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका,

२) जातीचे प्रमाणपत्र,

३) शाळा सोडल्याचा दाखला / जन्मतारखेचा दाखला.

४) प्रमाणित केलेली अनुभव प्रमाणपत्रे,

५) पासपोर्ट आकाराचे दोन फोटो,

६) शासकीय अनुभव असल्यास अनुभव दाखला,

७) डिमांड ड्राफ्ट,

८) नावात बदल असल्यास पुरावा,

९) स्वतचे नाव व पत्ता लिहिलेला लिफाफा ज्यावर ५/- रुपयांचे पोस्टाचे तिकीट लावलेले असेल.

१०) संबंधित काउन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.

अर्ज कसा करावा – अर्जाचा नमुना (थेट मुलाखत तक्त अ व ब) www.umc.gov.in या संकेतस्थळावरील जाहिरातीत उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका यांच्या कार्यालयातसुद्धा उपलब्ध आहे.

नॅशनल एससी – एसटी हब व इंडो जर्मन टूलरूम (IGTR) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने एससी (अजा)/एसटी (अज) युवक/युवती जे उद्योजक होऊ इच्छितात किंवा उद्योजक आहेत त्यांच्यासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम (Capacity Building Training) नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (ठरदा) लेव्हल – ६, वरील मोफत निवासी कोस्रेस.

१) अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन स्ट्रक्चरल डिझाइन अँड अ‍ॅनालिसिस –

पात्रता – सिव्हिल इंजिनीअरिंग/डिप्लोमा डिग्री उत्तीर्ण

२) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन टूलरूम डिझाइन –

पात्रता – मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनीअरिंग डिप्लोमा/ डिग्री उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दोन्ही कोर्ससाठी किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक.

प्रवेशक्षमता – दोन्ही कोर्ससाठी २५ जागा प्रत्येकी. प्रशिक्षणाचा कालावधी प्रत्येकी ७८० तास.

सदर प्रशिक्षण हे पूर्णपणे निशुल्क व दोन प्रकारचे आहे.

अ) निवासी (औरंगाबाद शहराबाहेरील उमेदवार)

ब) अनिवासी (औरंगाबाद शहरातील उमेदवार)

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

१) विहित नमुन्यातील व पासपोर्ट फोटोसहित अर्ज.

२) शाळा सोडल्याचा दाखला,

३) दहावी / बारावी / डिप्लोमा/डिग्रीचे गुणपत्र व प्रमाणपत्र,

४) जातीचे प्रमाणपत्र,

५) पासपोर्टसहित ४ कलर फोटो,

६) आधारकार्ड,

पात्रता प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया – दि. १९ फेब्रुवारी २०२०.

प्रशिक्षण सुरू होण्याचा दिनांक – २० फेब्रुवारी २०२०

निवडपद्धती – प्राप्त अर्जामधून निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करून निवडक उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविले जाईल.

विहित नमुन्यातील अर्ज (www.igtr-aur.org) या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह दि. १५ फेब्रुवारी, २०२० पर्यंत स्पीडपोस्टाने अथवा साध्या पोस्टाने किंवा प्रत्यक्ष खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करावेत.

‘प्रशिक्षण विभाग, इंडो जर्मन टूल रूम, पी-३१, एम.आय.डी.सी. इंडस्ट्रियल एरिया, चिखलठाणा, औरंगाबाद – ४३१००६’

अर्जाच्या पाकिटावर ‘नॅशनल एस.सी./एस.टी. हब योजनेअंतर्गत अर्ज’ असा स्पष्ट उल्लेख करावा.
Leave a Comment