UPSC Civil Service Exam 2020

UPSC Mains 2020 Schedule: मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 पासून

The Union Public Service Commission (UPSC) has released the Civil Services (Main) Examination 2020 schedule. According to the UPSC Mains 2020 schedule released by the Commission today, 6 November 2020, the main examinations will be conducted from 8 January 2021..

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा (Civil Services (Main) Examination, 2020) परीक्षा 2020 चे वेळापत्रक जाहीर केले. आयोगाने आज जाहीर केलेल्या यूपीएससी मेन्स 2020 च्या वेळापत्रकानुसार, 6 नोव्हेंबर 2020 रोजी, मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 पासून घेण्यात येतील. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षा 2020 च्या वेळापत्रकानुसार परीक्षा 17 जानेवारी 2021 पर्यंत चालतील. उमेदवार सिव्हिल सर्व्हिसेस प्रारंभिक परीक्षा २०२० मध्ये यशस्वी घोषित, ज्यांनी तपशीलवार अर्ज फॉर्म (डीएएफ) भरला आहे, ते यूपीएससी मेन्स वेळापत्रक 2020 कमिशनची अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in डाउनलोड करू शकतात किंवा खाली दिलेल्या थेट दुव्यावरून डाउनलोड करू शकतात.

Civil Services (Main) Examination, 2020 Examination Time Table  (129.34 KB) 

 

 नागरी सेवा (मुख्य ) परीक्षा 2020 वेळापत्रक

8 जानेवारी – पेपर 1 निबंध सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत
9 जानेवारी – पेपर 2 सामान्य अभ्यास -1 (सकाळी 9 ते दुपारी 12) आणि पेपर 3 सामान्य अभ्यास -2 (दुपारी 2 ते सायंकाळी 5)
10 जानेवारी – पेपर 4 सामान्य अभ्यास -3 (सकाळी 9 ते दुपारी 12) आणि पेपर 5 सामान्य अभ्यास -4 (दुपारी 2 ते सायंकाळी 5)
16 जानेवारी – भारतीय भाषा (सकाळी 9 ते दुपारी 12) आणि इंग्रजी (संध्याकाळी 2 ते संध्याकाळी 5)
17 जानेवारी – पेपर 6 पर्यायी विषय पेपर -1 (सकाळी 9 ते दुपारी 12) आणि पेपर 7 पर्यायी विषय पेपर -2 (दुपारी 2 ते संध्याकाळी 5)

नागरी सेवा परीक्षा 2020 ची अधिसूचना फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केली होती. प्राथमिक परीक्षा 31 मे रोजी होणार होती, परंतु कोविड  साथीच्या लॉक-डाऊनमुळे परीक्षेची तारीख वाढविण्यात आली. प्राथमिक परीक्षा ऑक्टोबर रोजी घेण्यात आली.


UPSC पूर्व परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता !

UPSC EXAM 2020 UPDATE : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० च्या तारखेत कदाचित पुन्हा फेरबदल होऊ शकतो. परीक्षेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने लोकसेवा आयोगाला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. कोर्टाने एका याचिकेसंदर्भातील सुनावणीच्या वेळी आयोगाला आपले म्हणणे दाखल करण्यास सांगितले आहे.

सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्स परीक्षा २०२० दोन ते तीन महिने स्थगित करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखर करण्यात आली आहे. यूपीएससीच्या २० उमेदवारांच्या वतीने वकील अलख आलोक श्रीवास्तव हा खटला चालवत आहेत. कोविड-१९ महामारी आणि देशातील विविध राज्यांमध्ये आलेला पूर या पार्श्वभूमीवर परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. याचिकेत म्हटलं आहे की परीक्षेसाठी केंद्रांची संख्याही खूप कमी आहे.

सध्या परिस्थिती सामान्य नाही. अशात उमेदवारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना समस्या येऊ शकतात. गुरुवारी २४ सप्टेंबर २०२० रोजी न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. खन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सुनावणी दिली. खंडपीठाने यूपीएससीला नोटीस पाठवून या प्रकरणी उत्तर मागितले आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. विद्यमान वेळापत्रकानुसार, यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० रोजी ऑफलाइन मोडवर होणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे ६ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. देशभरात ७२ शहरांमध्ये परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत.


An important announcement regarding when the UPSC Pre-Examination 2020 will be held has been made on the website of the Central Public Service Commission. This exam has been postponed due to immediate lockdown. The Central Public Service Commission has made a new announcement regarding the pre-examination. The announcement was made today on the Commission’s website regarding the date of the examination.

यूपीएससी पूर्व परीक्षा २०२० कधी होणार यासंदर्भातली महत्त्वाची घोषणा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. ही परीक्षा तूर्त लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेसंदर्भात नवी घोषणा केली आहे. परीक्षेच्या तारखेसंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर आज ही घोषणा करण्यात आली.

ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ३१ मे २०२० रोजी होणार होती. पण करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन स्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा कधी घेतली जाणार याबाबत बुधवारी २० मे रोजी माहिती देणार असल्याचे आयोगाने जाहीर केले होते. त्यानुसार आज ही घोषणा करण्यात आली की यूपीएससी पूर्व परीक्षा कधी घेतली जाणार ती तारीख आता ५ जून २०२० रोजी जाहीर केली जाणार आहे. करोनासंदर्भातल्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ५ जून रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर या तारखेची घोषणा करण्यात येईल.

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) दरवर्षी नागरी सेवा परीक्षा (यूपीएससी सीएसई – सिव्हिल सर्व्हिस परीक्षा) घेते. ही देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा आहे. देशातील लाखो तरुण यूपीएससी सेवेचे स्वप्न पाहतात. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेस बसतात.या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारत सरकारच्या प्रशासकीय व इतर सेवांमध्ये केली जाते.

सौर्स : मटा


UPSC परीक्षेमुळे या २४ सेवांची दारे होतात खुली

UPSC Exam Pattern : Candidates selected through this examination are appointed in the administrative and other services of the Government of India. IAS, IPS, we all know that. But the jobs available through this exam are not limited to this. Do you know which Government of India recruits successful candidates for the UPSC Civil Service Examination? The UPSC exam said that a limited picture of IAS or IPS officers is usually before our eyes. But this exam gives you the opportunity to be appointed to 24 different types of positions.

यूपीएससी परीक्षा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर साधारणपणे आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांचंच मर्यादित चित्र उभं राहतं. पण ही परीक्षा तुम्हाला २४ विविध प्रकारच्या पदांवर नेमणुकीची संधी देते. ही पदे कोणती वाचा…

यूपीएससी नागरी सेवा अंतर्गत सेवांचे प्रकार : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) दरवर्षी नागरी सेवा परीक्षा (यूपीएससी सीएसई – सिव्हिल सर्व्हिस परीक्षा) घेते. ही देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा आहे. देशातील लाखो तरुण यूपीएससी सेवेचे स्वप्न पाहतात. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेस बसतात.
या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारत सरकारच्या प्रशासकीय व इतर सेवांमध्ये केली जाते. आयएएस, आयपीएस तर आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु या परीक्षेद्वारे उपलब्ध असलेल्या नोकऱ्या एवढ्यापुरत्याच मर्यादित नाहीत. भारत सरकारच्या कोणत्या सेवांमध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत यशस्वी ठरलेले उमेदवारांची भरती होते, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

भारत सरकार अंतर्गत अशा सुमारे २४ सेवा आहेत ज्यामध्ये यूपीएससीतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेद्वारे नेमणूका केल्या जातात. त्या सर्व २४ सेवांची यादी येथे देत आहोत

१) भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस)
२) भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस)
३) भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)
४) भारतीय महसूल सेवा (कस्टम व केंद्रीय उत्पादन शुल्क) गट अ (भारतीय महसूल सेवा)
५) भारतीय महसूल सेवा (आयटी) गट अ
६) भारतीय टपाल सेवा, गट अ
७) भारतीय माहिती सेवा (कनिष्ठ श्रेणी), गट अ
८) भारतीय पी अँड टी अकाउंट्स अँड फायनान्स, गट अ
९) भारतीय ऑडिट आणि लेखा सेवा, गट अ
१०) भारतीय संरक्षण लेखा सेवा, गट अ
११) भारतीय ऑर्डिनन्स फॅक्टरी सेवा, गट अ
१२) भारतीय नागरी लेखा सेवा, गट अ
१३) भारतीय रेल्वे वाहतूक सेवा, गट अ
१४) भारतीय रेल्वे लेखा सेवा, गट अ
१५) भारतीय रेल्वे पर्सोनेल सेवा, गट अ
१६) रेल्वे संरक्षण दलात सहाय्यक सुरक्षा आयुक्त हे पद

१७) भारतीय संरक्षण इस्टेट सेवा, गट अ
१८) भारतीय व्यापार सेवा, गट अ (श्रेणी-3)
१९) भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, गट अ
२०) सशस्त्र सेना मुख्यालय नागरी सेवा, गट ब (विभाग अधिकारी ग्रेड)
२१) दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दमण दीव आणि दादर नगर हवेली सिव्हिल सर्व्हिसेस (प्रशासकीय), गट ब
२२) दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दमण दीव आणि दादर नगर हवेली पोलीस सेवा, गट ब
२३) पॉन्डिचेरी प्रशासकीय सेवा, गट बी
२४) पॉन्डिचेरी पोलीस सेवा, गट बी

यंदा तूर्त तरी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची पूर्व परीक्षा होणार आहे. त्याचा पॅटर्न पुढीलप्रमाणे आहे –

UPSC Pre Exam Pattern पूर्व परीक्षेचा पॅटर्न

या परीक्षेत दोन पेपर असतात. दोन्ही पेपर अनिवार्य असतात. प्रत्येक पेपरमध्ये २०० गुण असतात. म्हणजेच पूर्व परीक्षा एकूण ४०० गुणांची आहे.

दोन्ही पेपर्समध्ये (जनरल स्टडीज पेपर -१ आणि जनरल स्टडीज पेपर -२) ऑब्जेक्टिव्ह टाइप (एमसीक्यू) प्रश्न विचारले जातात. उमेदवारांना पेपर सोडवण्यासाठी दोन तास दिले जातात. म्हणजेच दोन पेपरसाठी एकूण चार तासांचा अवधी असतो.

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस पू्र्व परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर -2 पात्रता पेपर असतो. म्हणजेच या पेपरमध्ये यशस्वी होण्यासाठी या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये असतात.

या परीक्षेत नकारात्मक मूल्यांकन देखील आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराचे गुण कापले जातात. म्हणून उत्तर देताना काळजी घ्यावी.

सौर्स : मटा
Leave a Comment