When is the 10th-12th exam?

When is the 10th-12th exam?

दहावी-बारावीच्या परीक्षा कधी?

या आठवड्यात होणार दहावी, बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा

As per the latest news published in the newspaper Maharashtra State Board 10th examine will be expected in May 2021 and the 12th examine  will be expected after 15th April. All other important details regarding this are given below:

मुंबई – इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा या आठवड्यात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जाहीर करणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी माहिती दिली. मे महिन्यात दहावीची परीक्षा तर १५ एप्रिलनंतर बारावीची परीक्षा आयोजित करण्यात टेणार असल्याचे पाटील यांनी सोमवारी सांगितले. तत्पूर्वी दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती.

मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे निवृत्त झाल्याने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभार दिनकर पाटील यांच्यावर सोपवण्यात आला आहे. या आठवड्यात आम्ही परीक्षांच्या तारखा जाहीर करू. विद्यार्थी, शिक्षक, पालकांना परीक्षांच्या तारखा पुरेशा वेळेआधी माहित असल्या तर त्यांना तयारीसाठी पूर्ण वेळ मिळेल, असे पाटील म्हणाले. दहावी-बारावी परीक्षा सर्वसाधारणपणे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जातात. पण यावर्षी कोविड-१९ महामारी स्थितीमुळे त्या विलंबाने घेण्यात येणार आहेत. परीक्षा ४० ते ४५ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

पाटील म्हणाले, नुकतेच पुरवणी परीक्षांचे आयोजन मंडळाने केले होते. ही परीक्षा सुमारे दोन लाखांवर विद्यार्थ्यांनी दिली. परीक्षा सुरळीत पार पडली. दोन आठवड्यात निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांना कोणतीही समस्या जाणवली नाही. याच पद्धतीने संपूर्ण सुरक्षा, खबरदारीसह नियमित परीक्षाही आम्ही आयोजित करू असा आम्हाला विश्वास आहे. दरम्यान, दहावीचे परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.


10th & 12th Exam 2020-2021 : Different messages are circulating on social media about CBSE Class 10th and Class 12th Examinations. The message says that the 10th and 12th exams will be held in March, but now the CBSE has given an explanation. The CBSE has said that nothing has been decided yet regarding the 10th and 12th standard examinations. Also, parents and students should not believe the rumors spread on social media, the CBSE said. A few months back, the CBSE had reduced the syllabus for Class 10th and 12th Exam for the year 2021, as schools were not started due to the corona lockdown. Every year 30 lakh students appear for the CBSE board exams. In 2019, 31.14 lakh students had registered for the CBSE board exams.

  • व्हायरल होणाऱ्या मेसेजनंतर CBSE कडून स्पष्टीकरण  – सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज फिरत आहेत. मार्च महिन्यामध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा होणार असल्याचं या मेसेजमधून सांगण्यात येत आहे, पण याबाबत आता सीबीएसई (CBSE) ने स्पष्टीकरण दिलं आहे. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत अजून काहीही निश्चित करण्यात आलं नसल्याचं सीबीएसईने सांगितलं आहे. तसंच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरून पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही सीबीएसईने सांगितलं आहे.
  • सीबीएसईच्या प्रश्नपत्रिकेमध्येही मोठे बदल होऊ शकतात. दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न वाढण्याची, तसंच परीक्षा application based असण्याची आणि MCQ वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिक्षण मंत्र्यांनीही या बदलांबाबत त्यांच्या वेबिनारमध्ये भाष्यं केलं. तसंच विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल, असा विश्वास पोखरियाल यांनी व्यक्त केला आहे. तसंच परीक्षांच्या तारखा खूप आधी घोषित केल्या जातील. आम्ही तुमच्यासोबत आहोत. सगळे निर्णय विद्यार्थ्यांचं हित पाहून घेतले जातील, असंही पोखरियाल म्हणाले.
  • सीबीएसईच्या प्रसिद्धी पत्रकानुसार ‘कोरोना काळात विद्यार्थी आणि पालकांच्या परिस्थितीबद्दल सीबीएसईला माहिती आहे. सगळ्यांशी सल्लामसलत करूनच कोणताही निर्णय घेतला जाईल. तसंच हा निर्णय सगळ्यांपर्यंत बोर्डाच्या वेबसाईटच्या माध्यमातून पोहोचवला जाईल.’
  • काहीच महिन्यांपूर्वी सीबीएसईने दहावी आणि बारावीचा 2021 सालच्या परीक्षेसाठीचा सिलॅबस कमी केला होता, कारण कोरोना लॉकडाऊनमुळे शाळाच सुरू झाल्या नव्हत्या. प्रत्येकवर्षी 30 लाख विद्यार्थी सीबीएसई बोर्डाची परीक्षा देतात. 2019 साली 31.14 लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षेसाठी नावं रजिस्टर केली होती.

सौर्स : डेलीहंट

Leave a Comment