Workers will now be registered online

Workers will now be registered online

कामगारांची नोंदणी होणार आता ऑनलाईन

Online Registration of Worker : Called a lockdown seven months ago. Due to the Corona Effect lots of outsider worker went to their town. Recruitment of new workers stopped to prevent corona infection. Many factories closed, workers moved to villages. There is an atmosphere of anxiety among the workers. The work of the Workers Welfare Board will now be online to provide relief to the workers in such adverse conditions. The benefits of worker registration and schemes can be availed through online facility.
Registration is done by the Workers Welfare Board for workers working in private factories, shops, commercial organizations, corporations. Concerned workers and their families are given the benefit of various schemes. For this, the concerned establishment is expected to give the Labor ID number to the board for the registration of those workers.

Online Registration of Worker

कोरोनासंसर्ग टाळण्यासाठी नवीन कामगार भरती थांबली. सात महिन्यांपूर्वी लॉकडाउन पुकारला. अनेक कारखाने बंद झाले, कामगार गावी गेले.  कामगारांत चिंतेचे वातावरण आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कामगारांना दिलासा देण्यासाठी कामगार कल्याण मंडळाचे कामकाज आता ऑनलाईन होणार आहे. यात कामगार नोंदणी व योजनांचे लाभ ऑनलाईन सुविधेद्वारे घेता येणार आहेत.


खासगी कारखाने, दुकाने, व्यावसायिक संस्था, महामंडळात काम करणाऱ्या कामगारासाठी कमागार कल्याण मंडळातर्फे नोंदणी केली जाते. संबंधित कामगार व त्याच्या कुटुंबीयांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्यासाठी संबंधित अस्थापनाने त्या कामगारांच्या नोंदणीसाठी लेबर आयडी नंबर मंडळाला देणे अपेक्षित आहे.
वर्षातून एक वेळा कामगार नोंदणी शुल्क 15 ते 25 रुपये भरणे आवश्‍यक आहे. त्यातून संबंधित कामगारांच्या मुलांना मंडळातर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार, इंग्लिश स्पिकिंग प्रशिक्षण दिले जाते. सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी बहुतेक कामगार आजवर कार्यालयात येणे कागदपत्रे सादर करणे तसेच अधिकाऱ्यांच्या सह्या घेणे, मंजुरी घेणे यासाठी हेलपाटे मारावे लागत होते. यात कामगारांचा वेळ व पैसा जात होता. ही बाब विचारात घेता कामगार कल्याण मंडळाचे कामकाज डिजिटल करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील मंडळाची कार्यालये माहिती तंत्रज्ञानाने जोडली जातील.

कामगारांच्या योजना व तसेच मंडळाच्या कामकाजाची माहिती, नवे निर्णय याची माहिती देणारे संकेतस्थळ होईल. कामगारांना थेट नोंदणी करणे व योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारासाठी मोबाईल ऍपही तयार होत आहे. या ऍपद्वारे कामगारांना नोंदणी करणे किंवा योजनांचा लाभ घेता येणे शक्‍य होणार आहे.

सौर्स : सकाळ

 

Leave a Comment