ZP Bharti 2023 Apply Here

Zilha Parishad Bharti 2023

ZP Bharti 2023- The recruitment in Zilla Parishad in the state has been stalled for more than three and a half years, and after being postponed three times, the recruitment has been cancelled. Due to the stagnation of this recruitment during the three governments, there is a lot of dissatisfaction among the youth aspirants

राज्यातील जिल्हा परिषदेमधील भरती मागील साडेतीन वर्षांहून अधिक काळ रखडली असून, तीन वेळा ही भरती पुढे ढकलल्यानंतर रद्द करण्यात आली आहे. तीन सरकारांच्या काळात ही भरती रखडल्याने भरती इच्छुक तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आता राज्य सरकारने यातील केवळ आरोग्य विभागाच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर केले असून, उर्वरित पदांच्या भरतीचे काय, ज्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करून अर्जाची रक्कम भरली आहे त्याचे काय, असा प्रश्न उमेदवार विचारत आहेत.

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

तीन सरकारच्या काळातही होऊ शकली नाही भरती

  • देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना;२६ मार्च २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या १३,५२१ जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली.
  • महाविकास आघाडी सरकारने १४ जून २०२१ रोजी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून ते २८ जून २०२१ रोजी रद्द केले.
  • २८ ऑगस्ट २०२१ रोजी पुन्हा वेळापत्रक जाहीर करून ते २९ सप्टेंबर २०२१ रोजी रद्द केले.
  • १० मे २०२२ रोजी पुन्हा वेळापत्रक जाहीर केले.
  • नंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा २६ ऑगस्ट २०२२ रोजी वेळापत्रक जाहीर करून १९ सप्टेंबर रोजी रद्द केले.
  • २१ ऑक्टोबर २०२२ रोजी शिंदे-फडणवीस सरकारने ही संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

निवडणूक आचारसंहिता, कोरोनाही कारणीभूत  –

  • आधी निवडणूक आचारसंहिता, त्यानंतर महापोर्टल रद्द झाल्याने आणि कोरोना महामारी अशा विविध कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती.
  • जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचे वय दिवसेंदिवस वाढत असून, भरती होत नसल्याने तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य आले आहे.
  • रखडलेली ही भरती तत्काळ करण्यात यावी.

 

ZP Bharti 2022-2023 : Maharashtra Zilla Parishad recruitment related new ordinance has been published today. According to that, there is an indication that Zilla Parishad will be recruited soon. Also the probable schedule of recruitment is published


ZP Bharti 2022- As per the news of Talathi Bharti 2022 is that The recruitment process of 13 thousand 521 vacant posts in Zilla Parishads which was started in 2019 is still stalled in 2022. Read More details about ZP Recruitment 2022 are given below.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई : जिल्हा परिषदांतील १३ हजार ५२१ रिक्त पदांची २०१९मध्ये सुरू करण्यात आलेली भरती प्रक्रिया २०२२मध्येही रखडलेलीच आहे. तीन वर्षांपूर्वी याकरीता घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी २० लाख उमेदवारांनी पाच ते सात हजार रुपये अर्जापोटी भरले. ग्रामीण आणि निमशहरी भागांतील उमेदवार परीक्षा होण्याची वाट पाहत आहेत. असे असताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भरती प्रक्रियाच रद्द केली असल्याबाबतची कथित ध्वनिफीत समाजमाध्यमांतून फिरू लागल्याने राज्यभरातील उमेदवारांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांना केवळ सत्ता दिसते, त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते, पण नोकरीसाठी परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार दिसत नाही.

तुकाराम नाटकर या उमेदवाराने वेगवेगळय़ा जिल्हा परिषदांमध्ये चार-पाच पदांसाठी २०१९ मध्ये अर्ज केला. त्यासाठी पाच-सात हजार रुपये परीक्षा शुल्क भरले. माझे आई-वडील कोरडवाहू शेतकरी आहेत. आता त्यांना शेतीचे कामही झेपत नाही. माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. नोकरी मिळण्यासाठी जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केला, पण तीन वर्षांत परीक्षाच झालेली नाही. राज्यातील सरकारे बदलली, पण परीक्षेचा पत्ताच नाही. वय वाढत चालले आहे. माझ्यासारखे लाखो उमेदवार भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषद भरती परीक्षा व्हायला हवी. परीक्षा होत नसल्याने आता नैराश्याची भावना वाढत आहे. माझ्यासारख्या उमेदवारांनी करायचे काय, असा उद्विग्न प्रश्न तुकारामने विचारला.

ZP Recruitment 2022

जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केला, तेव्हा माझे वय २४ वर्षे होते, आता मी २८ वर्षांचा आहे. वय वाढते आहे, पण परीक्षा काही होत नाही. या भरती प्रक्रियेत तीन पदांसाठी अर्ज केला होता. या अर्जासाठी भरलेले अडीच हजार रुपये अडकले आहेत. परीक्षा होईल या आशेवर आजपर्यंत वाट पाहिली. साडेतीन वर्षांत परीक्षेबाबत मार्ग निघाला नाही. माझे आईवडील शेतकरी आहेत. मी अजूनही बेरोजगार आहे. पण परीक्षेची वाट पाहण्याशिवाय पर्यायही नाही, असे अजय खोजे या उमेदवाराने सांगितले.

जिल्हा परिषद भरतीमध्ये पाच पदांसाठी अर्ज भरला होता. त्यासाठी अडीच हजार रुपये शुल्क भरले. आतापर्यंत तीन वेळा भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. परीक्षा होईल या आशेने तयारी करत आहोत. परीक्षा का होत नाही याचे उत्तरही मिळत नाही. आई वडील शेती करतात. परीक्षा कधी होईल याची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. काय करावे हे कळत नाही. मंत्री-प्रशासनाशी संपर्क साधला तरी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असे एका उमेदवाराने सांगितले.

‘गेली तीन-साडेतीन वर्षे अभ्यास करत आहोत. आज परीक्षा होईल, उद्या परीक्षा होईल, अशी आश्वासने मिळतात. होत काहीच नाही. २०१९ मध्ये १३ हजार ५१२ विविध पदांसाठी २० लाखांहून अधिक मुलांनी अर्ज भरले.  पण सरकारला परीक्षा काही घेता आली नाही. परिणामी मान खाली घालून अभ्यास करण्यापलीकडे आमच्या हाती काही राहिले नाही’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया राधाकिशन बडे या विद्यार्थ्यांने दिली.


ZP Bharti 2022-2023 : The staff recruitment process will be started from 15th September 2022 under Amravati Zilla Parishad in Maharashtra. In a few days all Zilla Parishad recruitment exam dates of Maharashtra will be announced. The Chief Executive Officer of Zilla Parishad, Avishyant Panda, demanded that the vacancies to be filled by promotion should be filled before the recruitment process. Read More details about ZP Recruitment 2022 are given below.

जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 15 सप्टेंबर पासून सुरु होणार

 Maharashtra ZP Bharti 2022: अमरावती जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 15 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. 06 जुलै 2022 रोजी महाराष्ट्रातील ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद भरतीमधील सद्यस्थिती आणि भरतीप्रक्रीयेमधील पुढील कार्यवाही या विषयावर मीटिंग घेण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदा जि. प. भरती परीक्षांच्या तारखा जाहीर होतील.

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती बाबत महाराष्ट्र शासनाने 10 मे 2022 रोजी नवीन शासन निर्णय जाहीर करून जिल्हा परिषद भरती संदर्भात update (Maharashtra ZP Bharti 2022) दिला होता. मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील पदे भरण्याचा आदेश  दिनांक 14 जून, 2021 दिला होता. पण परीक्षा झाली नव्हती. आता या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत एक शासन निर्यय (Maharashtra ZP Bharti 2022) प्रसिद्ध करण्यात आला होता. ज्यात Maharashtra ZP Bharti 2022 ची परीक्षा ही जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात येईल असे सांगितले होते व महाराष्ट्र जिल्हा परिषद भरतीची परीक्षा येत्या काही दिवसात होणार आहे.

अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत १५ सप्टेंबरपासून कर्मचारी भरती प्रक्रिया राबविल्या जाणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया आधी पदोन्नतीने भरावयाची रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे जि. प. आरोग्य सेवा कर्मचार्यांच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला लवकरच जिल्हा परिषद भरती परीक्षांच्या तारखा जाहीर होतील.

 


As per the latest updates regarding the ZP Bharti 2022 is that the way for the recruitment of 13521 posts in all Zilla Parishads in the Maharashtra state which has been stalled for three years has been cleared. The General Administration Department of the state has approved the recruitment and selected one company for the examination. So more than 20 lakh applicants have got relief. Read the complete details given below and keep visit us.

ZP bharti 2022

ZP Bharti 2022 updates for 13000 posts Group C– As per the News published in one of the District News paper is that 13000 post under the Zilha Parishad for Group C Will be filled soon. The posts needs to be filled in ZP are Health Workers, Nurses, Laboratory Technicians, Pharmaceutical Manufacturers and Health Supervisors etc., Candidates read the following article for ZP Group C Bharti 2022 Details:

जिल्हा परिषदेतील ग्रुप क संवर्गाची १३००० पदे लवकरच भरणार

ZP Bharti 2022

ZP Bharti 2022-2023 Latest updates for 10127 posts – Recruitment process has been started for 10127 vacancies in the categories of Health Workers, Nurses, Laboratory Technicians, Pharmaceutical Manufacturers and Health Supervisors in the Zilla Parishads of the State. The recruitment will be done through a district selection committee set up under the chairmanship of the district collector, Rural Development Minister Hasan Mushrif said on Thursday.

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.

आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या नव्या तारखा

ZP Bharti 13000 posts

जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती

  1. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे.
  2. पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार आलेल्या अर्जातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.  पाच संवर्गासाठी एकूण चार लाख अर्ज प्राप्त झाले असून या  अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
  3. आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गातील मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुधारित आकृतीबंधास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

 ZP Bharti 2022- Vacancy Details 

आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकाची ४७ पदे, औषध निर्मात्याची ३२४ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ९६, आरोग्य सेवकाची तीन हजार १८४ पदे आणि आरोग्य सेविकांची सहा हजार ४७६ पदे अशी एकूण १० हजार १२७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.


ZP Recruitment 2022 Apply Here

ZP Bharti 2022 Latest updates for 5300 postsStudents are likely to be relieved to see positive signs about starting the ZP Recruitment process. Due to Corona and his various controversies, recruitment of health workers, nurses and other related posts in the Zilla Parishad has been stalled for the last three years. The students were disappointed that the recruitment process could not be completed even after the advertisement was removed. Meanwhile, the movement for immediate start of ZP Recruitment 2022 Process has gained momentum once again.

ZP Recruitment 2022 Process will be implemented for 5300 posts through Zilla Parishad. Now, as per the instructions issued by the state government, the way has been cleared for recruitment of 5300 persons. Educational Qualification For this, it is necessary to have B.Pharm / D.Pharm degree for drug manufacturer. Also MS-CIT / CCC is required to have computer knowledge.

जिल्हा परिषद भरती 2022 संभाव्य प्रश्नसंच

ZP Bharti 2022 Exam Syllabus Download

  • एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी  महत्वाची बातमी आहे. गेल्या तीन वर्षापासून रखडलेली जिल्हा परिषदेतील  ZP Health  आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदासाठी ही जाहिरात 2019 ला काढण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे रखडली होती.
  • दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी राज्य शासनाने शासन निर्णय काढत 2019 ची भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार 2019 मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही. भरती प्रक्रिया सुरु करण्याबाबतच सकारात्मक चिन्ह दिसून लागल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
  • कोरोनामुळे  आणि त्यानं वेगवेगळ्या वादांमुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता आणि इतर संबंधित पदांची भरती रखडली होती. जाहिरात काढण्यात आल्यानंतरही ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्यानं विद्यार्थी निराश झाले होत. दरम्यान, आता पुन्हा एकदा भरती प्रक्रिया तत्काळ सुरु करण्यात येण्याच्या हालचालींना वेग आलाय.
  • 5300 जणांच्या भरतीचा मार्ग मोकळा – जिल्हा परिषदेने मार्च 2019 मध्ये आरोग्य विभागासाठी भरती जारी केलेली होती. पण कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलली गेली. जिल्हा परिषदेमार्फत 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आता राज्य सरकारनं जारी केलेल्या निर्देशांनुसार 5300 जणांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय. यासाठी शैक्षणिक पात्रता औषध निर्माता यासाठी B.Pharm/D.Pharm ची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच MS-CIT/CCC हे संगणकीय ज्ञान असणे गरजेचे आहे.

Eligibility for ZP Recruitment 2022 5300 post

  1. For the post of health worker, 10th pass as well as computer knowledge is required.
  2. The post of Assistant Nurse and Maharashtra Paricharya Parishad should be registered for the post of Health Nurse.
  3. It has been stipulated that for the post of health supervisor, the health worker must have completed the course For the post of Laboratory Technician, B.Sc should be a graduate in Physics / Chemistry / Biology / Zoology / Microbiology.
  4. The age limit for this test was 18 to 38 years.
  5. These posts will be filled all over Maharashtra.
  6. The registration fee will be Rs 500 for open category, Rs 250 for backward class and free for ex-servicemen.
  7. In this process, the candidate had to be prepared with details before filling up the online form.
  8. Personal details like Aadhar card number, date of birth, email id, phone number, address details, photograph and signature are required.
  9. Fill in the name of the applicant as per SSC or birth certificate, as if the name does not match with any of your official identity card, your application will be rejected.

जिल्हा परिषदेतील १३००० रिक्त जागा सरळ सेवा भरतीद्वारे भरणार

ZP Recruitment 2022 for 13000 posts13000 vacancies in Zilla Parishad will be filled through Direct Recruitment Board. The state government has decided to fill the vacancies in Group C and D in Maharashtra Zilla Parishad through Direct Recruitment, it is informed by Rural Development Minister Hasan Mushrif on Monday (2nd May 2022). The program on Anukama Recruitment basis was held at Zilla Parishad’s Rajarshi Shahu Hall. Minister Mushrif made the statement at the event.

“The government had decided to outsource ‘C’ and ‘D’ class seats in the Zilla Parishad. However, withdrawing the decision today, Minister Mushrif clarified that the seats would be filled on behalf of a committee headed by the District Collector.”

जिल्हा परिषदेतील १३००० रिक्त जागा सरळ सेवा भरतीद्वारे भरणार :-

  • महाराष्ट्र जिल्हा परिषदेतील ग्रुप ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या रिक्त जागा सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी (दि.२) दिली. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती आदेश प्रदान कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. या कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ यांनी हे विदान केली.
  • जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गाच्या जागा आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु, हा निर्णय आज मागे घेत मंत्री मुश्रीफ यांनी या जागा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या वतीने भरण्यात येतील, असे स्पष्ट केले.

As per the Nagpur Newspaper addition the way has been cleared for the recruitment of 13521 posts in all the Zilla Parishads in the Maharashtra state which has been stalled for three years. Senior officials from the Rural Development and Panchayat Raj Department informed that the recruitment process, which was delayed due to technical reasons, has now become easier. General Administration Department has given permission for  ZP Recruitment 2022. Read the below given details carefully and keep visit us.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५२१ पदांची तीन वर्षांपासून रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने पदभरतीला मान्यता दिली असून परीक्षेसाठी एका कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे २० लाखांहून अधिक अर्जदारांना दिलासा मिळाला आहे. राज्यात मेगा भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यात जिल्हा परिषदे मधील १३ हजार ५२१ जागांचा समावेश होता. यासाठी मार्च २०१९ मध्ये २० लाखांवर अर्ज आले. एका उमेदवाराने तीन ते चार हजार रुपये खर्च करून विविध पदांसाठी अर्ज केलेत. वर्षभरापासून विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू असल्याने जिल्हा परिषदेचीही पदभरती होईल, अशी अपेक्षा उमेदवारांना होती. मात्र, सरकारकडून कुठलीच हालचाल नसल्याने रोष वाढला होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या भरती प्रक्रियेचा मार्ग आता सुकर झाल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सामान्य प्रशासन विभागाने भरतीसाठी परवानगी दिली आहे.

1 thought on “ZP Bharti 2023 Apply Here”

Leave a Comment