ZP Bhati 2020

ZP Bhati 2020

जिल्हा परिषदेची भरती ‘लॉकडाउन’

ZP Recruitment 2020 : As per the government policy, 10 to 20 per cent of the total vacancies declared vacant in the Zilla Parishad are to be filled on compassionate basis while conducting recruitment through direct service and nomination. Accordingly, the administration department of the Zilla Parishad had initiated proceedings. However, the process has been hampered by a lockdown. Most of the candidates on the waiting list are eight to nine years old. As the age limit of some candidates on the waiting list is 45 years, the possibility of loss of these candidates due to age increase after May cannot be ruled out. Questions are likely to be raised about the livelihood of these candidates. The number of vacancies is large at present. In this situation, the government should approve the recruitment, a demand has been made by the Zilla Parishad Clerical Staff Union. The compassionate recruitment process is in its final stages, which also includes the age limit. Candidates whose age limit expires after the month of May may be at a disadvantage. Therefore, this recruitment process needs to be implemented immediately.

ZP Recruitment 2020- Latest Updates

शासकीय धोरणानुसार सरळसेवा, नामनिर्देशनाद्वारे पदभरतीची कार्यवाही करताना जिल्हा परिषदेच्या रिक्त घोषित केलेल्या एकूण भरती योग्य पदांच्या १० ते २० टक्के पदे अनुकंपा तत्त्वाने भरावयाची आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने कार्यवाही सुरू केली होती. मात्र, या पदभरतीला लॉकडाउनचा फटका बसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.

करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध आणले आहेत. विकास निधीत ६७ टक्के कपात करण्यात आली असून, नवीन पदभरती करू नये, असे आदेशही काढले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेच्या एकूण भरतीयोग्य पदांच्या १० ते २० टक्के पदे अनुकंपा तत्त्वाद्वारे भरण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे सर्व जिल्हा परिषदांमध्ये अशी नियुक्ती देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने २६१ उमेदवारांची प्रतीक्षायादीही जाहीर केली होती. मात्र, आता शासननिर्णयानुसार आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये, असे स्पष्ट आदेश निर्गमित झाले आहेत. परिणामी ही प्रक्रिया रखडली आहे. मात्र, ही पदभरती पूर्ण करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या नाशिक शाखेतर्फे करण्यात आली आहे.

Age Limit for Zilha Parishad Bharti 2020 – वयोमर्यादेचा व्हावा विचार

प्रतीक्षा यादीतील बहुतेक उमेदवारांना आठ ते नऊ वर्षे झालेली आहेत. प्रतीक्षा सूचीतील काही उमेदवारांची वयोमर्यादा ४५ वर्षे असल्याने मे महिन्यानंतर वय वाढल्याने या उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. या उमेदवारांच्या उदरनिर्वाहाबाबत प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत रिक्त पदाची संख्या मोठी आहे. या परिस्थितीत शासनाने पदभरतीस मान्यता द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

अनुकंपाची पदभरती कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, त्यात वयोमर्यादेचीही अट आहे. मे महिन्यानंतर वयोमर्यादा संपणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ही भरतीप्रक्रिया त्वरित राबविणे गरजेचे आहे. – महेंद्र पवार, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ..


रिक्त पदांमुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ

ZP Bharti 2020 : Palghar ZP Bharti will be expected soon in this year. Six years have passed since the creation of Palghar district. However, in the various administrative departments such as police, revenue, zilla parishad in the district, 75% of the seats are still vacant. Therefore, Deputy Chief Minister Nilesh Sambre has demanded that these seats be filled up promptly. Candidates read the complete details carefully and keep visit on this page for the further updates.

समन्वयकपदांच्या भरतीमध्ये अनियमितता

शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदांमुळे जिल्ह्यातील अनेक प्रश्न तसेच राहिले असून विकास कामांना खीळ बसत असल्याने या पदांची तातडीने भरती करावी, अशी मागणी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली आहे.

पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र तरीही जिल्ह्यातील पोलिस, महसूल, जिल्हा परिषद अशा विविध प्रशासकीय विभागांमध्ये ७५ टक्के जागा अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे या जागा तातडीने भरण्यात याव्यात, अशी मागणी उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आदिवासीबहुल असलेल्या पालघर जिल्ह्याचा परिसर व कामाचा व्याप मोठा आहे. २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या जीवावर जनतेची कामे होत नाहीत. तसेच जिल्ह्यात विविध नवीन प्रकल्प आल्याने जिल्ह्यातील कामाचा प्रचंड ताण पडत असल्याने जिल्ह्याच्या विकासावर या सर्वांचा परिणाम होऊन जिल्हा निर्मितीचा उद्देशच साध्य झालेला नाही. पालघर जिल्ह्यातील सर्व कार्यालयांतील रिक्त पदांच्या तात्काळ भरतीबाबत संबंधित विभागांना आदेश द्यावेत, अशी मागणी सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पालघर जिल्ह्यात अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे तसेच अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे जनतेची कामे होत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी ७५ टक्के रिक्त असलेल्या पदांची तातडीने भरती करावी आणि कोणतीही रजा न टाकता मनमानी पद्धतीने गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री महोदयांकडे केल्याची माहिती जिप उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी दिली.

अधिकारी-कर्मचारी वेळेवर उपस्थित रहात नसल्याबद्दल तक्रार

जिल्हा परिषदेची सत्ता हाती आल्यानंतर मागील १५ दिवस आपण स्वत: जिल्ह्यातील विविध प्रशासकीय कार्यालये, शाळा, आरोग्य केंद्रे यांना भेटी दिल्या असता बहुतांश विभागातील अधिकारी, कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत उपस्थित रहात नाहीत, रजेच्या अर्जाची कुठेही नोंद न करता परस्पर सुट्टीवर असतात. तर अधिकारी वर्ग बैठकीच्या नावाखाली गैरहजर असतात. त्यामुळे जनतेची कामे होत नाहीत, अशी तक्रार पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष

निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसेच पाच दिवसांचा आठवडा केल्याने किमान कार्यालयीन वेळेत सर्वांनी हजर राहून जनतेची कामे करावीत यासाठी संबंधित विभागांना निर्देशित करावे, अशी मागणीही निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सौर्स : मटा

झेडपीच्या शाळांत ६११ पदे रिक्त

Nashik ZP Recruitment 2020 : After 2012 There were a large number of vacancies after the closure of teachers; But after September 2017, the ban was lifted. After that, 202 teachers became active in the district. Subsequently, many teachers were recruited through compassionate recruitment and inter-district transfer. As a result, the 1100 number of vacancies in June 2019 has decreased. However, 611 positions are still vacant today. Read the complete details carefully which is given below:

‘या’ जिल्ह्यात अनुकंपा भरतीसाठी नवा निर्णयNew Update

सर्वाधिक संख्या नांदगाव, मालेगाव, येवला, सुरगाण्यात

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षकांची ६११ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. नांदगाव तालुक्यातील नवे पांझण येथे शिकवायला शिक्षक नाही म्हणून पंचायत समितीवर मंगळवारी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे रिक्त शिक्षकांच्या पदांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३,३८५ शाळा असून, चार लाखांच्या आसपास विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. मात्र, प्रत्येक तालुक्यात रिक्त शिक्षकपदाची बोंब आहे. विशेष म्हणजे मालेगाव, येवला, नांदगाव व सुरगाणा तालुक्यात रिक्त शिक्षकांच्या पदाची संख्या ८० च्या आसपास आहे.

जिल्ह्यात ११ हजार ७९९ शिक्षकांची मंजूर पदे आहेत. त्यात ११ हजार १८८ शिक्षक कार्यरत आहेत. यात ६११ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागाने एक जानेवारी रोजी एकत्रित केलेल्या माहितीत तालुकानिहाय मंजूर पदे व कार्यरत पदे यांचा तपशील दिला आहे. त्यात सर्वाधिक शिक्षकांची पदे नांदगाव तालक्यात असून, त्याची संख्या ८३ आहे. या तालुक्यासाठी ७१४ पदे मंजूर आहेत; पण केवळ ६३० शिक्षक येथे कार्यरत आहेत. नांदगावखालोखाल मालेगाव तालुक्यात हीच स्थिती आहे. येथे ८३ पदे रिक्त आहेत. तालुक्यात ११८९ शिक्षकांची पदे मंजूर असून, ११०६ पदे कार्यरत आहेत. सुरगाणा तालुक्यातही ८०, तर येवला तालुक्यात ७८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तालुकानिहाय रिक्त शिक्षकांच्या पदात सर्वाधिक कमी दिंडोरी तालुक्यात १०, तर नाशिक तालुक्यात १४ पदे रिक्त आहेत.

तरी ६११ पदे रिक्त

२०१२ नंतर शिक्षकभरती बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्त पदे होती; पण सप्टेंबर २०१७ नंतर ही बंदी उठवली. त्यानंतर जिल्ह्यात २०२ शिक्षक रुजू झाले. त्यानंतर अनुकंपा तत्त्वावरील भरती व आंतरजिल्हा बदलीतून बरेच शिक्षक मिळाले. त्यामुळे जून २०१९ मध्ये असलेली ११०० रिक्त पदांची संख्या कमी झाली. मात्र, आजही ६११ पदे रिक्त आहेत.

ऑनलाइनमुळे अधिकार नाहीत

शिक्षकांच्या बदल्या नेहमी चर्चेचा विषय होतो; पण आता ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या बदल्या होत असल्यामुळे त्याचे अधिकार प्रशासनाकडे नाहीत. त्यामुळे एखाद्या जागेवर शिक्षकांची संख्या कमी असली तरी तेथे तातडीने हे पद भरता येत नाही. त्यामुळे ही अडचण प्रशासनाची डोकेदुखी आहे. आंतरजिल्हा बदलीनंतर किंवा बडतर्फ शिक्षकाला रुजू करताना ही पदे भरता येणार आहेत. ही ऑनलाइन पद्धत २७ फेब्रुवारी २०१७ पासून सुरू झाली आहे.

सरकार कसे करणार

सरकारी शाळेत शिक्षणाचा दर्जा उंचावा, यासाठी राज्य सरकारचे एकीकडे प्रयत्न सुरू असले तरी दुसरीकडे शिक्षकच नसेल तर हा दर्जा कसा सुधारणार, हा प्रश्न आहे. दिल्लीच्या निवडणुकीत शाळांचा दर्जा सुधारल्याचा परिणाम दिसला. हा परिणाम महाराष्ट्रात दिसावा, यासाठी सरकार कसे करणार, हा प्रश्न आहे.

मुलांना चांगले शिक्षण मिळायला हवेच. त्यासाठी शिक्षकांची गरज आहे; पण रिक्त पदे भरण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला नाही. त्यामुळे राज्य सरकारकडे ही रिक्त पदे भरून नवीन शिक्षकांची भरती करावी, अशी मागणी केली आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे.

शिक्षकांची रिक्त पदे

तालुका – मंजूर पदे – कार्यरत पदे – रिक्त पदे

 • बागलाण – ९३८- ९१२- २६
 • चांदवड – ६६१- ६२५-३६
 • देवळा – ४२३-४०२- २१
 • दिंडोरी – ९४२- ९३२- १०
 • इगतपुरी – ८९९- ८७२- २७
 • कळवण – ६४९- ६३१- १८
 • मालेगाव – ११८९- ११०६- ८३
 • नांदगाव – ७१४- ६३०- ८४
 • नाशिक – ५२२-५०८- १४
 • निफाड – ९९९- ९५३- ४६
 • पेठ – ५९३- ५६८-२५
 • सिन्नर – ७८७-७६१-२६
 • सुरगाणा – ८९९-८१९- ८०
 • त्र्यंबकेश्वर -७४९-७१५- ३४
 • येवला – ८२६- ७४८-७८
 • पब्लिक स्कूल व कन्याशाळा -९-६ -३
 • एकूण – ११७९९- १११८८-६११

सौर्स : मटा

Zilla Parishad Recruitment 2020: Zilla Parishad has published the notification for the recruitment of Shikshak Sevak, Attendant, Peon, Talathi, Pharmacist, Civil Engineering Assistant, Gramsevak, etc & Various Posts. ZP Bharti invited for filling 794 Vacancies. Closing date for offline application form is  6th January 2020 and 9th January 2020 Candidates see the table below where we mentioned the District Wise details of No. of Vacancies and Vacant seat in every district of Maharashtra.

जिल्हा परिषद महाराष्ट्र भरती २०२० ला सुरुवात झाली आहे. सर्व जिल्हाच्या जाहिरात pdf फाइल्स आम्ही ह्या पेज वर दिल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आणि ९ जानेवारी २०२० आहे. आम्ही पुढील सर्व माहिती ह्याच पेज वर अपडेट करत राहू. तेव्हा आमच्या www.mahagov.info ला भेट देत रहा…

ZP Recruitment 2020-Notification Details

 • Organization Name: Zilla Parishad Maharashtra
 • Name of the Posts: Shikshak Sevak, Attendant, Peon, Talathi, Pharmacist, Civil Engineering Assistant, Gramsevak, etc & Various Posts
 • Job Location: Maharashtra
 • The start date for Apply: 28th December 2019
 • Last date for Apply: 6th January 2020 and 9th January 2020

Zilla Parishad Recruitment 2020:

Zilla Parishad Bharti 2020: Below Table Show the Number of vacancies in District Wise of Maharashtra

जिल्हानिहाय लिंक्सपदसंख्या
अमरावती जिल्हापरिषद भरती जाहिरात20 Posts
औरंगाबाद जिल्हापरिषद भरती जाहिरात22 Posts
बुलढाणा जिल्हा परिषद भरती जाहिरात 56 Posts
बीड जिल्हा परिषद भरती जाहिरात 16 Posts
धुळे जिल्हा परिषद भरती जाहिरात 20 Posts
भंडारा जिल्हा परिषद भरती जाहिरात35 Posts
चंद्रपूर जिल्हा परिषद भरती जाहिरात6 Posts
गडचिरोली जिल्हा परिषद भरती जाहिरात39 Posts
हिंगोली जिल्हा परिषद भरती जाहिरात1 Posts
जालना जिल्हा परिषद भरती जाहिरात 13 Posts
जळगाव जिल्हा परिषद भरती जाहिरात5 Posts
कोल्हापूर जिल्हा परिषद भरती जाहिरात7 Posts
लातूर जिल्हा परिषद भरती जाहिरात6 Posts
नागपूर जिल्हा परिषद भरती जाहिरात168 Posts
नाशिक जिल्हा परिषद भरती जाहिरात8 Posts
नंदुरबार जिल्हा परिषद भरती जाहिरात1 Posts
परभणी जिल्हा परिषद भरती जाहिरात5 Posts
पुणे जिल्हा परिषद भरती जाहिरात32 Posts
रायगड जिल्हा परिषद भरती जाहिरात122 Posts
रत्नागिरी जिल्हा परिषद भरती जाहिरात7 Posts
सांगली जिल्हा परिषद भरती जाहिरात4 Posts
सातारा जिल्हा परिषद भरती जाहिरात75 Posts
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती जाहिरात11 Posts
सोलापूर जिल्हा परिषद भरती जाहिरात68 Posts
ठाणे जिल्हा परिषद भरती जाहिरात9 Posts
वर्धा जिल्हा परिषद भरती जाहिरात27 Posts
वाशीम जिल्हा परिषद भरती जाहिरात 7 Posts
गोंदिया जिल्हा परिषद भरती जाहिरात1+ Posts
पालघर जिल्हा परिषद भरती जाहिरात3 Posts

How to Apply For ZP Bharti 2020

 • Application Form Submission process of ZP Bharti 2020 is given here.
 • The PDF Application Form links of respective District Recruitment are given above.
 • If you want to Apply for your desired Zilla, then Click on respective link of that District.
 • Then you should Download the PDF of application forms

Important Date:

 • Last Date for Submission of Online Application Form: 6th January 2020 and 9th January 2020
4 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *