ZP Solapur Bharti Results, Selection List

ZP Solapur Bharti Non-Eligibility List

नोकरीसाठीचे तीन हजारावर अर्ज “या’ झेडपीत अपात्र

ZP Solapur Bharti 2020 – The recruitment process for some posts reserved for the scheduled tribes of the Zilla Parishad is underway. About 4500 applications have been filed for 34 seats. However, about 3,000 of them have become ineligible. The percentage of ineligible applications is 70% ahead of the total. Candidates who are ineligible for the application have been given below:

ZP Solapur Bharti Results, Selection List

अनुसुचीत जमाती विशेष पदभरती मोहिम सन 2019-20 पात्र / अपात्र यादी

सदर पात्र /अपात्र याद्या हया केवळ वय, शैक्षणिक पात्रता, परिक्षा फी या बाबींच्या संदर्भाने तयार करण्यांत आल्या असून सदर पात्र यादीतील उमेदवार कोणत्याही टप्यावर कागदपत्र छाननीमध्ये अपात्र अढळून आल्यास अपात्र करण्यांत येईल.
अ.क्र
पदाचे नांव
पात्र
अपात्र
1परिचरयादी पाहण्यासाठी येथे क्लिक करायादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
2आरोग्य सेविकायादी पाहण्यासाठी येथे क्लिक करायादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
3आरोग्य सेवक (40%)यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करायादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
4आरोग्य सेवक (50%)यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करायादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शिक्षण सेवक पात्र यादीयादी पाहण्यासाठी येथे क्लिक करायादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
5कंत्राटी ग्रामसेवकयादी पाहण्यासाठी येथे क्लिक करायादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या काही पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. जवळपास 34 जागांसाठी साडेचार हजारावर अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, त्यामधील जवळपास तीन हजारावर अर्ज अपात्र झाले आहेत. अपात्र झालेल्या अर्जाची टक्केवारी एकूण अर्जाच्या 70 टक्‍याच्या पुढे आहे. अर्ज अपात्र झालेल्या उमेदवारांना हरकत घेण्यासाठी गुरुवार (ता. 9) सायंकाळपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

अनुसूचित जमातीसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी असणे आवश्‍यक केले आहे. प्रमाणपत्राची पडताळणी केली नसेल तर तो अर्ज अपात्र करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदायोग्य पात्रता नसेल तर तोही अर्ज अपात्र करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांचे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत, त्यांनी संबंधित विभागाशी व्यक्तिशः किंवा संबंधित विभागाच्या इ-मेलद्वारे हरकत दाखल करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत. पात्र-अपात्र अर्जांच्या याद्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्या याद्या पाहून अपात्र झालेल्या उमेदवारांनी हरकती दाखल करायच्या आहेत.

परिचर पदासाठी एक हजार 80 अर्ज आले आहेत. त्यापैकी 459 उमेदवारांचे अर्ज अपात्र झाले असून उर्वरित 621 अर्ज पात्र झाले आहेत. आरोग्य सेवक (50 टक्के, फवारणी कर्मचारी) यासाठी सहा अर्ज आले आहेत, त्यापैकी पाच अर्ज अपात्र झाले असून एकच अर्ज पात्र झाला आहे. कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी 785 अर्ज आले आहेत. त्यापैकी 345 अर्ज अपात्र झाले असून 440 अर्ज पात्र झाले आहेत. आरोग्य सेविका या पदासाठी एक हजार 652 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी केवळ 174 अर्ज पात्र तर एक हजार 478 अर्ज अपात्र झाले आहेत. अपात्र झालेल्या अर्जांची संख्या या विभागात जास्त आहे. शिक्षण सेवक पदासाठी 815 अर्ज आले आहेत. त्यापैकी केवळ 24 अर्ज पात्र झाले आहेत. अपात्र झालेल्या अर्जांची संख्या 791 इतकी आहे. शिक्षण विभाग शिक्षण सेवकांच्या 20 जागा भरणार आहे.

रात्री उशिरापर्यंत कामकाज 
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग व शिक्षण विभागामध्ये रात्री उशिरापर्यंत अर्जांची छाननी व त्या याद्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम सुरू होते. प्रत्येक विभागप्रमुख आपापल्या कार्यालयात बसून ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेण्यावर भर देत असल्याचे दिसून आले.

सौर्स : सकाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *